पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी प्रशांत शितोळे 

रमेश मोरे
बुधवार, 24 जानेवारी 2018

जुनी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही निवड केली असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे व डॉ. शैलेश मोहीते पाटील आदी उपस्थित होते.

प्रशांत शितोळे हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीत त्यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा ते पक्ष कार्यात सक्रीय झाले होते. निवडणुकीतील पराभवानंतर शहराच्या राजकारणातील त्यांचा प्रभाव कायम होता. तीन टर्म नगरसेवक स्थायी अध्यक्ष अशी पिंपरी पालिकेत त्यांनी पदे भूषवली आहेत. सत्ता बदलानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाहेर असुनही त्यांनी सत्ताधारी भाजपा विरोधात अनेक कामात विरोधकाची भूमिका सक्षमपणे निभावली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही शितोळे यांना पक्षाबाहेर ठेवणे शक्य नव्हते. त्यांच्या राष्ट्रवादीतील सक्रीयतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बळकटी मिळाल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जाते.

Web Title: Marathi news pune news rashtravadi congress pimpri chinchwad