'आरटीई'साठी आज अंतिम मुदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळेतील 25 टक्के राखीव जागांवर ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत आता रविवारपर्यंत (ता. 11) वाढविण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेची पहिली लॉटरी येत्या सोमवारी (ता. 12) जाहीर होणार आहे. आतापर्यंत ऑनलाइनद्वारे जवळपास एक लाख 86 हजार अर्ज आले आहेत. राज्यातील सुमारे एक लाख 26 हजार राखीव जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे उपसंचालक शरद गोसावी यांनी दिली. 

राज्यातील आठ हजार 990 खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी तीन वेळा लॉटरी काढण्यात येणार आहे. लॉटरी पद्धतीने एका यादीत नाव जाहीर झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचे नाव पुन्हा दुसऱ्या यादीत नसेल. नाव जाहीर झाल्यानंतर पालकांना शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीतच संबंधित शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश घ्यावा लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिली, दुसरी आणि तिसरी लॉटरी फेरी घेऊन जास्तीत जास्त बालकांना प्रवेश मिळावा, यासाठीचे नियोजन शिक्षण विभागाने केल्याची माहितीही गोसावी यांनी दिली. 

राज्यातील खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत सुरवातीला 28 फेब्रुवारीपर्यंत होती. त्यानंतर ही मुदत 7 मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती; परंतु अधिकाधिक विद्यार्थ्यांचे अर्ज भरता यावेत, यासाठी ही मुदत रविवारपर्यंत वाढवली आहे. 

अशी असेल आरटीईची प्रवेश प्रक्रिया :- 
प्रवेश प्रक्रिया : कालावधी : 

  • पहिली लॉटरी : 12 ते 13 मार्च 
  • प्रत्यक्ष शाळेत प्रवेश घेण्याची मुदत : 14 ते 24 मार्च 
  • क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी उर्वरित जागांची नोंद करणे : 24 ते 27 मार्च 

  • दुसरी लॉटरी : 28 ते 31 मार्च 
  • प्रत्यक्ष शाळेत प्रवेश घेण्याची मुदत : 2 ते 12 एप्रिल 
  • क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी उर्वरित जागांची नोंद घेणे : 13 ते 16 एप्रिल 

  • तिसरी लॉटरी : 17 ते 18 मार्च 
  • प्रत्यक्ष शाळेत प्रवेश घेण्याची मुदत : 19 एप्रिल ते 3 मे 

जिल्हानिहाय 25 टक्के राखीव जागा आणि आतापर्यंत आलेले अर्ज :- 
 
जिल्हा

25 टक्के आरक्षण लागू होणाऱ्या शाळांची संख्या 25 टक्के राखीव जागा अर्जांची संख्या
पुणे 933 16,436 41,906
मुंबई 347 8,374 10,524
ठाणे 640 16,594 12,558
नागपूर 662 6,985 23,560
सोलापूर 351 3,697 3,498
नाशिक 466 6,589 10,307
नगर 395 5,367 4,621
कोल्हापूर 347 3,501 1,455
Web Title: marathi news pune news Right to Education RTE Admissions