प्राधिकरणाची रस्तारूंदीकरणासाठी धडक कारवाई

ज्ञानेश्वर भंडारे
बुधवार, 10 जानेवारी 2018

वाल्हेकरवाडी : रावेत-वाल्हेकरवाडी या ३४.५ मीटर अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा ताबा घेण्याकरीता अडथळा ठरत असलेल्या कच्च्या आणि पक्क्या स्वरूपातील जवळपास ७४ घरांवर प्राधिकरण प्रशासनाने बुलडोजर फिरवला.

वाल्हेकरवाडी : रावेत-वाल्हेकरवाडी या ३४.५ मीटर अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा ताबा घेण्याकरीता अडथळा ठरत असलेल्या कच्च्या आणि पक्क्या स्वरूपातील जवळपास ७४ घरांवर प्राधिकरण प्रशासनाने बुलडोजर फिरवला.

आज (बुधवार) सकाळी ९ वाजल्यापासून वाल्हेकरवाडी रावेत मार्गावरील छत्रपती शिवाजी चौक ते ओढ्यापर्यंतची घरे पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने भुईसपाट केली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतचे काम अर्धवट अवस्थेत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने कंबर कसली असून त्या करीता आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी वाल्हेकरवाडी येथील सर्वे क्र. ११५ ते १२१ मधील ७४ घरांना प्राधिकरणाने रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाच्या वतीने ०१ जानेवारी रोजी खाली करण्याच्या अंतिम नोटीस दिल्या होत्या. त्या अनुषंगाने बाधित घरांवर बुलडोझर फिरवून घरे भुईसपाट केली. या मध्ये ५ पक्की घरे आणि ६९ तात्पुरत्या स्वरूपातील पत्रा शेड व कौलारू बैठ्या घरांचा समावेश आहे. ही कारवाई करताना मुख्य प्राधिकरण उपअभियंता अनिल दुधलवार, कार्यकारी अभियंता संदीप खलाटे, उपजिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, उपनिरीक्षक लोहकरे, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे उपस्थित होते. ही कारवाई ३ जेसीबी, ३ पोकलेन व ३० पोलीस कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली. 

कारवाई मध्ये काहीही अडचण आली नाही, नागरिकांचा प्रतिसाद चांगला होता. ज्या नागरिकांची घरे यामध्ये गेली आहेत, त्या नागरिकांना नवीन सदनिका मिळवून देण्यासाठी आम्ही प्राधिकरण सभेत ठराव मांडणार आहोत, अशी माहिती उपअभियंता अनिल दुधलवार यांनी दिली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून भूसंपादनाअभावी रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतचे काम अर्धवट अवस्थेत होते. या रस्त्याची फेर आखणी करून प्राधिकरणाने काम हाती घेतले. ही फेर आखणी करण्यासाठी स्थानिक नेत्यांपैकी एका आजी व माजी नगरसेवकाने दबाव आणल्याची नागरिकांमध्ये यावेळी चर्चा होती. 

 

Web Title: Marathi news pune news road winding at valhekarwadi rawet