पिंपरीत चोरट्यांनी सात दुकाने फोडली

संदीप घिसे
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पिंपरी (पुणे) : कटावणीच्या साहाय्याने कुलूप तोडून पाच ते सहा चोरट्यांनी सात दुकाने फोडली. ही घटना सोमवारी पहाटे प्राधिकरण निगडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा चोरटे निगडी प्राधिकरण येथील पेठ क्रमांक 26 ए स्क्वेअर या इमारती मध्ये सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास आले. सुरक्षा रक्षकाला दमदाटी करीत एका तासात कटावणीच्या सहाय्याने सात दुकाने फोडली. काही ठिकाणचे लॅपटॉप व इतर साहित्य चोरून नेले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.  निगडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Marathi news pune news robbery pimpri