पीएमपीचे सुटेभाग चोरणारा ताब्यात

संदिप जगदाळे
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

हडपसर : पीएमपीच्या हडपसर डेपोत बांधकाम साहित्य ने आण करणा-या ट्रॅक्टर मधून पीएमपी बसचे सूटे भाग घेऊन जाणा-या चोरटयास पीएमपीच्या सुरक्षा विभागाच्या निरिक्षकाच्या चाणाक्षपणामुळे पकडण्यात यश आले. राजेंद्र बाबूराव शेळके (वय 26) असे त्या चोरट्याचे नाव असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
 
हडपसर आगाराच्या पाठीमागे कार्यशाळे शेजारी सर्व्हीस स्टेशनचे बांधकाम सुरू आहे. त्याचबरोबर आगारामागे महापालिकेच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. या बांधकामासाठी बांधकाम साहित्य ने आण करण्यासाठी ट्रॅक्टरची येजा सतत सुरू असते. पीएमपीचे सुरक्षा विभागाचे निरिक्षक संतोष रामचंद्र घाडगे हे आगार तपासणी साठी हडपसर आगारात आले होते. त्यावेळी एक ट्रॅक्टर वेगाने आगारा बाहेर पडत असल्यामुळे घाडगे यांना संशय आला. घाडगे यांच्यासोबत असलेले रखवालदार सुरेश पानसरे व उत्तम निकम यांना बोलावून त्या ट्रॅक्टरला अडवण्यास सांगितले. ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यात पीएमपी बसचे जुने परंतू महत्वातचे सुटे भाग आढळून आले. टॅक्टर चालक शेळके यांची कसून चौकशी केली. आगारातील सर्व्हीस स्टेशनचे काम करणारऱ्या ठेकेदार कंपनीकडे हा ट्रॅक्टर कार्यरत असून तो कंपनीच्या सांगण्यावरून स्केल मशीन नेण्यासाठी आगारात आला होता. त्याचवेळी त्याने आगारातील कार्यशाळे शेजारी ठेवण्यात आलेले सुटे भाग सर्वांची नजर चुकवून घेवून जात असल्याची कबूल केले. शेळकेला ताब्यात घेवून संतोष घाडगे यांनी हडपसर पोलिसात हजर केले आणि चोरीची फिर्याद रात्री उशीरा दिली. हडपसर पोलिस ठाण्याचे नानासाहेब गोरख तपास करीत आहेत.
 
Web Title: Marathi news pune news robbery of pmp bus parts