कुष्ठरूग्णांच्या सेवाकार्याचा वसा पुढे न्यावा: रोहिणी वैद्य

रमेश मोरे
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

महाराष्ट्रातील पहिल्या स्वयंप्रेरीत कुष्ठधाम स्थापन करणाऱ्या महिला डॉ. इंदुताई यांचा जिवन प्रवास व त्यांच्या सहवासात घडलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. या स्नेहमेळाव्यास आनंदग्राम मध्ये शिक्षण घेतलेल्या व सध्या भारताच्या कानाकोपऱ्यात वास्तव्यास असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुनी सांगवी : समाजातील तरूणांनी पुढे येवुन कुष्ठरूग्णांसाठी चालवण्यात येणाऱया सेवाकार्याचा वसा पुढे न्यावा. कुष्ठरूग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची आर्थिक, सामाजिक शैक्षणिक प्रगती होणे गरजेचे आहे. यासाठी तरूण पिढीने पुढे यायला हवे असे आनंदग्राम कुष्ठधामच्या माजी शिक्षिका रोहिनी वैद्य यांनी दापोडी येथील आनंदवन कुष्ठधाम माजी विद्यार्थी मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

त्यापुढे म्हणाल्या कुष्ठरूग्णांना आजही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षणापासून ते सामाजिक विषमतेचा प्रवास आजही कायम आहे. त्यांच्या सामाजिक शैक्षणिक, आर्थिक जडण घडणीसाठी आता तरूण पिढिने पुढे यायला हवे. आनंदग्राम सोसायटी कुष्ठरूग्ण पुनर्वसन केंद्र डुडुळगाव आळंदी देवाची या संस्थेच्या संस्थापिका डॉ. इंदुताई पटवर्धन यांच्या १९ व्या पुण्यतिथी निमित्त दापोडी येथील आनंदवन कुष्ठधाम येथे माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात डॉ. इंदुताई पटवर्धन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

महाराष्ट्रातील पहिल्या स्वयंप्रेरीत कुष्ठधाम स्थापन करणाऱ्या महिला डॉ. इंदुताई यांचा जिवन प्रवास व त्यांच्या सहवासात घडलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. या स्नेहमेळाव्यास आनंदग्राम मध्ये शिक्षण घेतलेल्या व सध्या भारताच्या कानाकोपऱ्यात वास्तव्यास असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल खरमाटे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वितेसाठी दस्तगीर आत्तार, समाधान वारी, अकबर आत्तार, भारत काकडे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: marathi news Pune news Rohini Vaidya talked about health