शासनाचा विकास निधी आणू : रोहित पवार

संतोष आटोळे
गुरुवार, 18 जानेवारी 2018

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ ते उंडवडी कडेपठार या मार्गावरील शिर्सुफळ ते गोलांडवाडी या अनेक वर्ष दुरावस्था असलेल्या मार्गाचे जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 अंतर्गत सुमारे 50 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपुजन शिर्सुफळ येथे रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पवार बोलत होते.

शिर्सुफळ : जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गुणवडी मतदारसंघामध्ये मुलभुत सुविधांसह जलसंधारण, शिक्षण, आरोग्य, रस्ते या सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले  आहे. याबरोबरच वंचितांना जिल्हा परिषदेच्या योजनांचा अधिकाधिक लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासह आगामी काळात जिल्हा परिषदेच्या तसेच शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या माध्यमातुन गटासाठी अधिकाधिक विकास निधी आणण्यासाठी कटिबध्द आहे. असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केले.

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ ते उंडवडी कडेपठार या मार्गावरील शिर्सुफळ ते गोलांडवाडी या अनेक वर्ष दुरावस्था असलेल्या मार्गाचे जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 अंतर्गत सुमारे 50 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपुजन शिर्सुफळ येथे रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब आटोळे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, सरपंच अतुल हिवरकर, उपसरपंच अनुसया आटोळे, उद्योजक राजेंद्र खराडे, बाजार समितीचे संचालक वसंत गावडे, हनुमंत मेरगळ, दादासाहेब आटोळे, सुखदेव हिवरकर, बांधकाम विभागाचे उपअभियंता कोकरे, सहाय्यक अभियंता कांबळे, ग्रामसेवक दत्तात्रय धावडे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.  

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन तळागाळापासुन काम करण्याची संधी मिळत आहे. आपल्या पदाच्या माध्यमातुन पात्र परंतू वंचित असलेल्या सर्वसामान्यांना जिल्हा परिषदेच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवुन देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या रस्त्याच्या कामामुळे गेल्या अनेक वर्षापासुन दुरावस्था असलेल्या या मार्गाची दुरुस्ती असल्याने प्रवाशी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Marathi news Pune news Rohit Pawar development work