पुणे - एस. आर. व्हिक्टरी स्कूलच्या स्नेह-संमेलन थाटात संपन्न 

समीर तांबोळी
शनिवार, 3 मार्च 2018

उंड्री (पुणे) : परिवर्तन शिक्षण संस्थेच्या एस. आर. व्हिक्टरी स्कूल काळेपडळ, होळकरवाडी शाळांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. ए. पी. जे. अब्दुल कलाम, स्टिव्ह जॉब्स, हुकमीचंदजी चोरडिया, धीरूभाई अंबानी अशा थोर व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यावर आधारित थिम यावेळच्या स्नेहसंमेलनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. विद्यार्थ्यांनी या थोर व्यक्तींच्या वेशभूषेत येऊन त्यांचा जीवनपट उलगडला. 

कार्यक्रमाच्या आरंभी मास्टर सिद्दीक या विद्यार्थ्यांने कलामांचे भाषण सादर केले, पार्श्वभूमीवर अग्नी या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण(मिसाईल लौंचिंग) पडद्यावर होत होते. उपस्थितांनी यास प्रचंड दाद दिली.

त्यानंतर  स्टिव्ह जॉब्ज यांचा अॅपल कंपनी स्थापन करन्याचा  पूर्ण प्रवास व हुकमीचंदजीचोरडिया यांचे मिरची कांडप कारखाना ते सुहाना, अंबारी अशा सुप्रसिद्ध मसाला कंपनी सुरु करून पर्यंतचा प्रवास  धीरूभाई अंबानी यांचा औद्योगिक क्षेत्रातील योगदान आणि त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांनी अभिनयाद्वारे सादर केला.

या सर्व थोर व्यक्तींच्या आयुष्यात खूप संघर्ष आले त्यास ते कसे सामोरे गेले, मोठे झाले व जगासमोर उदाहरण ठेवले हे दर्शविण्यात आले. संकटांना घाबरू नका, त्याचा सामना करा आणि आपली ध्येयपूर्ण करा असे एस. आर. व्हिक्टरी स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे ब्रीद वाक्य होते. 

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  डी. ए. खोसे सर (पुणे ज़िल्हा गट शिक्षण विस्तारअधिकारी) व  कालिंदाताई मुरलीधर पुंडे (नगरसेविका वानवडी), बी.एस. सुकूल सर (संस्थापक सेंट. थेरेसास हायस्कूल लोणी, यवत), विनय सुकूल सर, एलिझाबेथ सुकूल मॅडम (प्रिंसिपल सेंट थेरेसास हायस्कूल) उपस्थित होते. 

एस. आर. व्हिक्टरी स्कूल च्या प्रिंसिपल शोभा लगड मॅडम यांनी शाळेचा  वार्षिक अहवाल सादर केले. परिवर्तन शिक्षण संस्थेचे सचिव  रोहिदास लगड सर, सुनंदा वाडकर, स्नेहल लगड, यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रियांका नागराज यांनी सर्वांचे आभार मानले.

Web Title: Marathi news pune news s r victory school gathering