कोरड्या आणि सुरक्षित होळीसाठी विद्यार्थ्यांचा नागरिकांशी संवाद

राजेंद्रकृष्ण कापसे 
शनिवार, 3 मार्च 2018

वारजे माळवाडी (पुणे) : कोरडी आणि सुरक्षित होळी व रंगपंचमी या सामाजिक विषयावर येथील जयहिंद माध्यमिक विद्यालयाच्या सहावीतील 24 विद्यार्थ्यांनी सुमारे वारजे माळवाडीतील मुख्य रस्त्यावर उतरून 350 नागरिकांशी संवाद साधत जनजागृती केली. 

वारजे माळवाडी (पुणे) : कोरडी आणि सुरक्षित होळी व रंगपंचमी या सामाजिक विषयावर येथील जयहिंद माध्यमिक विद्यालयाच्या सहावीतील 24 विद्यार्थ्यांनी सुमारे वारजे माळवाडीतील मुख्य रस्त्यावर उतरून 350 नागरिकांशी संवाद साधत जनजागृती केली. 

या विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या सहावी मधील या मोहिमेत स्नेहा चौधरी, केशव राठोड, शिवशंकर साहनी,यामिनी मांडवे, श्वेता बागवाले, विनत नायर, करण चौधरी, मुस्कान शेख, रवी शर्मा, महफुज शाह, अर्चना प्रजापती, ललिता गौड, प्रकाश चव्हाण, रीना रांका, श्रृती मौर्य, अजय विश्वकर्मा, प्रिन्स सिंग, जोगेश यादव, दिगंबर राठोड, अफजल शाह, अरमान खान, दीपक प्रजापती, आदित्य मौर्य, शिव साहनी हे 24 विद्यार्थी सहभागी झाले होते. ते सर्वजण होळीच्या दिवशी सायंकाळी रस्त्यावर उतरले. वारजे माळवाडीतील एनडीए रस्त्यावर ही मोहीम करण्यात आली. तीन विद्यार्थ्यांचा  एका गटांत होते. असे एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात त्यांनी ही जनजागृती केली.

विद्यार्थ्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना बोलविले. होळी व रंगपंचमी उत्सवात हानिकारक रसायनांचा वापर होतो. रंगामुळे पाण्याची होणारी नासाडी. पाण्याचे दुर्भिक्ष अनेक ठिकाणी जाणवत आहे. रासायनिक रंगाचा होणारा परिणाम याची जाणीव यावेळी त्यांनी करून दिली. 

कोरडा गुलाल व मिठाई 
होळी व रंगपंचमी साजरी करताना कोरडा गुलाल लावून, मिठाईचे पदार्थ देऊन इतरांच्या सुख दुःखात राहून आणि दुसऱ्यांना प्रेम देऊन होळी साजरी केली पाहिजे असे नागरिकांना सांगत होते. या शाळेतील प्रशासक सीमा तिवारी यांच्या मदतीने टीच फॉर इंडिया (एनजीओ)चे विद्यार्थी सागर गौडा यांनी याचे आयोजन केले होते.

Web Title: Marathi news pune news safe holi students talks with citizens