सहकारनगर, सातारा रस्त्यावरील दूकाने बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

पुणे : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुराकलेल्या महाराष्ट्र बंदला सहकारनगर, सातारा रस्ता, शिवदर्शन, पर्वती दर्शन, लक्ष्मीनगर, पद्मावती, मार्केटयार्ड, प्रेमनगर, महर्षीनगर, मुकूंदनगर, डॉयस प्लॉट गुलटेकडी या भागात नागरिकांचा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सहकारनगर गोळवळकर गुरूजी पथावरील, सातारा रस्त्यावरील मॉल, ज्वलर्स, दुकाने, हॉटेल, स्नॅक्स सेंटर, किराणा दूकाने बंद ठेवण्यात आली. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सहकारनगर, पद्मावती, लक्ष्मीनगर या परिसरातील स्कूल बस, व्हॅन, रिक्षाने शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना परत पाठविले गेले.

पुणे : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुराकलेल्या महाराष्ट्र बंदला सहकारनगर, सातारा रस्ता, शिवदर्शन, पर्वती दर्शन, लक्ष्मीनगर, पद्मावती, मार्केटयार्ड, प्रेमनगर, महर्षीनगर, मुकूंदनगर, डॉयस प्लॉट गुलटेकडी या भागात नागरिकांचा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सहकारनगर गोळवळकर गुरूजी पथावरील, सातारा रस्त्यावरील मॉल, ज्वलर्स, दुकाने, हॉटेल, स्नॅक्स सेंटर, किराणा दूकाने बंद ठेवण्यात आली. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सहकारनगर, पद्मावती, लक्ष्मीनगर या परिसरातील स्कूल बस, व्हॅन, रिक्षाने शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना परत पाठविले गेले. सहकारनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यावर ही शुकशुकाट पाहावयास मिळाला. पद्मावती, सातारा रस्त्यावरील अखिल भारतीय बहुजन सेना, बहुजन मुक्ती पार्टी विविध प्रकारच्या संघटना यांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले

Web Title: Marathi news pune news sahakarnagar strike