'सकाळ-एनआयई' एकांकिका स्पर्धेचे जल्लोषात बक्षीस वितरण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

पुणे : निकालाची उत्सुकता, बक्षिसे मिळाल्यावर विद्यार्थ्यांनी केलेला जल्लोष अन्‌ परस्परांचे अभिनंदन! या उत्साही वातावरणात 'सकाळ एनआयई' आयोजित यंदाच्या नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (ता. 16) झाला. या स्पर्धेत मराठी विभागात न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग (आभाळमाया), हिंदी विभागात एंजल हायस्कूल, लोणी काळभोर (धरती का बोझ) आणि इंग्रजी विभागात क्रांती शिक्षण संस्थेचे कन्या विद्यालय, चाकण (ओल्ड एज हाउस) नाटिकेला प्रथम क्रमांक मिळाला. 

पुणे : निकालाची उत्सुकता, बक्षिसे मिळाल्यावर विद्यार्थ्यांनी केलेला जल्लोष अन्‌ परस्परांचे अभिनंदन! या उत्साही वातावरणात 'सकाळ एनआयई' आयोजित यंदाच्या नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (ता. 16) झाला. या स्पर्धेत मराठी विभागात न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग (आभाळमाया), हिंदी विभागात एंजल हायस्कूल, लोणी काळभोर (धरती का बोझ) आणि इंग्रजी विभागात क्रांती शिक्षण संस्थेचे कन्या विद्यालय, चाकण (ओल्ड एज हाउस) नाटिकेला प्रथम क्रमांक मिळाला. 

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील एकूण 130 शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्राथमिक व बाद फेरीनंतर अंतिम फेरीत एकवीस नाटिका सादर करण्यात आल्या. त्यात भाषानिहाय विजेत्या संघांना अनुक्रमे रोख तीन हजार, दोन हजार, एक हजार पाचशे, पाचशे रुपये व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले; तर वैयक्तिक उत्कृष्ट अभिनय, नेपथ्य व दिग्दर्शन, अशी रोख पाचशे व स्मृतिचिन्ह, अशी एकूण पंचवीस हजारांची पारितोषिके देण्यात आली. 

सकाळ माध्यम समूहाच्या 'एनआयई' (न्यूजपेपर इन एज्युकेशन), सकाळ सोशल फाउंडेशन व दहाड पॅटर्न यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी एकांकिका स्पर्धा आयोजित केली होती. बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे ही स्पर्धा झाली. सर्वच संघांनी सामाजिक, शैक्षणिक विषयांवर आधारित एकांकिकेतून मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. विजेत्यांना सकाळ माध्यम समूहाच्या संचालिका मृणाल पवार, अभिनेत्री गिरिजा ओक, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

स्पर्धेचे संयोजन अब्दुल अजीज (मुख्य व्यवस्थापक, वितरण), वितरण व्यवस्थापक घनश्‍याम जाधव, संतोष कुडले, 'एनआयई'चे विशाल सराफ, 'सकाळ सोशल फाउंडेशन'चे राहुल गरड, अक्षय केळसकर, सुमीत जाधव यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण नीला शर्मा, प्रदीप फाटक, सुनीता निजामपूरकर, अर्चना कुबेर यांनी केले. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले दहाड पॅटर्न पुणे हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते. राज काझी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. 

सविस्तर निकाल 
मराठी भाषा 

 • प्रथम क्रमांक : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे (आभाळमाया) 
 • द्वितीय क्रमांक : आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी, कात्रज (बळी) 
 • तृतीय क्रमांक : म. ए. सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल (तुज आहे तुजपाशी) 
 • उत्तेजनार्थ : मॉडर्न हायस्कूल (मुलांचे) शिवाजीनगर (द फेट) 
 • उत्तेजनार्थ : डी. ई. एस. सेकंडरी स्कूल, टिळक रोड, पुणे (आबा) 

हिंदी भाषा 

 • प्रथम क्रमांक : एंजल हायस्कूल, लोणी काळभोर (धरती का बोझ) 
 • द्वितीय क्रमांक : जनता विद्यामंदिर, घोडेगाव, ता. आंबेगाव (पुस्तकों का विद्रोह) 
 • तृतीय क्रमांक : व्ही. पी. एस. हायस्कूल, लोणावळा (बेटी बचाओ) 
 • उत्तेजनार्थ : मॉडर्न हायस्कूल (मुलांचे) शिवाजीनगर, पुणे (अपनी धरा) 

इंग्रजी भाषा 

 • प्रथम क्रमांक : क्रांती शिक्षण संस्थेचे कन्या विद्यालय, चाकण (ओल्ड एज हाऊस) 
 • द्वितीय क्रमांक : विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा, बारामती (द गुडलक चॅन्ट) 
 • तृतीय क्रमांक : विद्या प्रतिष्ठान, भोर इंग्लिश मीडियम स्कूल, भोर (ऍन अर्थ डे कॅरोल) 

उत्कृष्ट अभिनय : मंथन महाडिक (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग), यज्ञा मतकर (आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी) 
उत्कृष्ट नेपथ्य : जयंत टोले (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग) 
उत्कृष्ट दिग्दर्शन : रवींद्र सातपुते (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग)

Web Title: marathi news pune news Sakal NIE One act play