'अंदाज आपला आपला' नाटकाचा उद्या प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

पुणे : नशीब असते का... भविष्यावर विश्‍वास ठेवायचा की नाही... ते शास्त्र आहे की थोतांड... अशा अनेक प्रश्‍नांबद्दल प्रत्येकाचे काही अंदाज असतात. व्यक्तीगणिक हे अंदाज बदलतात. अंदाजाच्या अशा असंख्य छटांतील खट्याळ नाट्य 'अंदाज आपला आपला' या नाटकातून फुललेले आहे. वेद प्रॉडक्‍शन आणि किवी प्रॉडक्‍शन यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे लेखन राजेश कोळवकर यांनी केले असून, दिग्दर्शन संतोष पवार यांचे आहे. 'सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच'च्या सभासदांसाठी या नाटकाचे दोन प्रयोग सोमवारी (ता. 5) दुपारी 12.30 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होत आहेत.

पुणे : नशीब असते का... भविष्यावर विश्‍वास ठेवायचा की नाही... ते शास्त्र आहे की थोतांड... अशा अनेक प्रश्‍नांबद्दल प्रत्येकाचे काही अंदाज असतात. व्यक्तीगणिक हे अंदाज बदलतात. अंदाजाच्या अशा असंख्य छटांतील खट्याळ नाट्य 'अंदाज आपला आपला' या नाटकातून फुललेले आहे. वेद प्रॉडक्‍शन आणि किवी प्रॉडक्‍शन यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे लेखन राजेश कोळवकर यांनी केले असून, दिग्दर्शन संतोष पवार यांचे आहे. 'सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच'च्या सभासदांसाठी या नाटकाचे दोन प्रयोग सोमवारी (ता. 5) दुपारी 12.30 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होत आहेत. 'सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच'चा हा तिसरा विनामूल्य कार्यक्रम आहे. 

भविष्य सांगणे हाच उदरनिर्वाहाचा व्यवसाय असलेल्या ज्योती माळगावकर यांच्या घरातल्या दिवाणखान्यात हे नाट्य घडते. माळगावकरांच्या घरातील खराडे नावाच्या एक जुन्या नोकराला आणि मुलगी गुणप्रियाला ज्योतीबाईंनी भविष्य सांगून पैसे मिळवणे अजिबात आवडत नसते, असे सांगितले. विरोधाला न जुमानता ज्योतीबाई भविष्यकथन सुरूच ठेवतात. भविष्य शिकायचे आहे, असे सांगून समीर हा तरुण मुलगा माळगावकरांच्या घरात प्रवेश करतो. प्रत्येक पात्राची भविष्याबद्दलची भिन्न मते, अत्यंत वेगळे स्वभाव यामुळे निर्माण होणारे विनोद आणि घडणारे धमाल नाट्य प्रत्यक्ष रंगमंचावरच पाहायला हवे. भविष्यकथनावर विसंबून राहू नका. योग्य प्रयत्नच यश मिळवून देतील, हाच संदेश या नाटकाद्वारे अधोरेखित होतो. 

साई-प्रीयूष यांचे संगीत असून, नाटकातील गीतांसाठी मयूर वैद्य या कोरिओग्राफरने कोरिओग्राफी केली आहे. प्रदीप मुळ्ये यांनी या नाटकाचे नेपथ्य केले आहे, तर वेशभूषा अंजली खोबरेकर यांची आहे. या नाटकात संतोष पवार, मधुरा देशपांडे, अक्षय केळकर, माधवी गोगटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. विनय गोपाळ अलगेरी, किशोर सावंत, विवेक नाईक हे नाटकाचे निर्माते आहेत. लोटस खाकरा नाटकाचे प्रायोजक आहेत. 

सभासदांसाठी सूचना... 

  • सभासदांसाठी व कुटुंबीयातील एका व्यक्तीला प्रवेश विनामूल्य. 
  • 9075011142 या क्रमांकावर फोनवर प्रवेश नोंदणी सकाळी 11 पासून अथवा 7721984442 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर नावनोंदणी करता येईल. 
  • नोंदणीच्या वेळी नाटकाच्या प्रयोगाची वेळ सांगून नोंदणी करणे आवश्‍यक, तसेच दिलेल्या वेळेच्या प्रयोगाला उपस्थित राहणे बंधनकारक राहील. नाटकाला 15 मिनिटे आधी प्रवेश दिला जाईल. 
  • सभासदांनी कार्यक्रमासाठी ओळखपत्र व माहिती पुस्तिकेतील तिसऱ्या क्रमांकाची प्रवेशिका व सभासद कार्ड आणणे आवश्‍यक. काही जागा राखीव.
Web Title: marathi news pune news Sakal Sahyadri Suraksha Kavach