‘सकाळ वास्तू एक्‍स्पो २०१८’ला आज प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे - घरासाठी तुमचे बजेट, इच्छा, आवड, सोय याची उत्तरे देणाऱ्या दोन दिवसांच्या भव्य ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो २०१८’ला शनिवारी (ता. ३) प्रारंभ होत आहे. म्हाळुंगे, बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे होणाऱ्या या एक्‍स्पोमध्ये परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प सादर केले जाणार आहेत. फ्लॅट्‌स, प्लॉट्‌स, सेकंड होमसाठी अनेक पर्यायांचीही माहिती उपलब्ध आहे. शिवाय घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, ॲमेनिटीज, लोकेशन, आसपासचा परिसर अशा सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी हा एक्‍स्पो प्रभावी ठरणार आहे. साधारणतः ९ लाख रुपयांपासून ते २ कोटी रुपयांपर्यंत बजेट असलेल्या घरांची माहिती उपलब्ध असणार आहे. 

एक्‍स्पोमध्ये तीसहून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या दीडशेहून अधिक प्रकल्पांची माहिती मिळणार आहे. पुण्याच्या चारही बाजूंना उभे राहणारे प्रकल्प आणि पुण्याबाहेरील प्रकल्पांचीही सविस्तर माहिती इथे मिळणार आहे. शिवाय रिअल इस्टेटशी निगडित होमलोनपासून फायनान्सपर्यंतच्या सर्व प्रश्‍नांबाबतच्या शंकांचे समाधानही करता येणार आहे. 

एक्‍स्पोमध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्रची गृहकर्ज योजनेची माहितीही मिळेल. बॅंक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांसाठी खास गृहकर्ज योजना सादर केली आहे. या अंतर्गत ऑन द स्पॉट गृहकर्जांना तत्त्वतः मंजुरी, नियमित परतफेड केल्यास दोन ईएमआय माफ, गृहकर्जासाठी प्रक्रिया शुल्क माफ, पगारातून जास्तीत जास्त ७० टक्के कपात, दीर्घकालीन परतफेडीसाठी कमी ईएमआय, इतर बॅंक आणि टॉप-अप कर्जावरील टेकओव्हरसाठी आवश्‍यक कालावधी केवळ १८ महिने आदी सुविधा प्रदर्शनात गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकास मिळू शकणार आहेत. 

पुण्याभोवतीचे प्रकल्प, त्यांचे बजेट, कोणत्या प्रकल्पांमधून कोणत्या सुविधा मिळणार, कोणत्या ठिकाणी पैसे गुंतविणे जास्त फायद्याचे राहू शकते, याबरोबर रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय आपल्याला पाहता येणार आहेत. त्यामुळे हा एक्‍स्पो गृहखरेदीदारांच्या मनातील घर साकारण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

Web Title: marathi news pune news sakal vastu expo 2018 pune home