‘द-बॅंग द टूर’चा अनुभव फ्लॅश मॉबमधून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

प्रवेशिका येथे मिळतील... 
ticketexpress.in , 
बुक माय शो
पेटियम
इनसायडर.इन 
www.dabanggtourepune.com वर तिकिटे उपलब्ध असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.

पुणे - ‘‘चला पुणेकर मंडळी... लेट्‌स गो टू बालेवाडी...’’ असं आवाहन करत तरुणांचा एक उत्साही, सळसळता ग्रुप अचानक प्रकटतो आणि सुरू होतो एक फ्लॅश मॉब. पुण्यात होणाऱ्या ‘टायगर’ सलमानच्या ‘द-बॅंग द टूर’ लाइव्ह कॉन्सर्टची उत्सुकता वाढत असताना या कॉन्सर्टच्या निमित्ताने पुण्याच्या विविध भागांमध्ये होत असलेल्या फ्लॅश मॉब्जनाही तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि कोरिओग्राफर गुरू रंधवा पुण्यातील या कॉन्सर्टच्या निमित्ताने पहिल्यांदाच या लाइव्ह टूरमध्ये सहभागी होत आहेत, हे अनेक वर्षांनंतर पुण्यात होणाऱ्या या भव्य लाइव्ह कॉन्सर्टचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे.

‘द- बॅंग द टूर’ लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सलमानसोबतच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, कोरिओग्राफर प्रभुदेवा हेदेखील सहभागी होणार आहेत. पुढील शनिवारी (ता. २४) म्हाळुंगे- बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सायंकाळी सातला हा कार्यक्रम रंगणार आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहयोगाने होणारी ही कॉन्सर्ट ‘फोर पिलर्स इव्हेंट्‌स’ने ‘१८ डिग्रीज’ आणि ‘निर्माण ग्रुप’च्या सहकार्याने ‘द- बॅंग’ टूर पुण्यात येत आहे. 

पुणेकर या तारकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले असताना जंगली महाराज रस्ता, सिंहगड रस्ता, टिळक रस्ता, कोथरूड, मगरपट्टा, कोरेगाव पार्क आणि शहराच्या अन्य काही भागांमध्ये होत असलेल्या फ्लॅश मॉब्ज्‌नाही उत्साही प्रतिसाद मिळत आहे.

येत्या आठवड्याभरात या कॉन्सर्टच्या निमित्ताने शहरात आणखीही कार्यक्रम होणार आहेत.

मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, सातारा, औरंगाबाद शहरांमध्येही या कार्यक्रमाविषयी उत्सुकता आहे. 

प्रवेशिका येथे मिळतील... 
ticketexpress.in , 
बुक माय शो
पेटियम
इनसायडर.इन 
www.dabanggtourepune.com वर तिकिटे उपलब्ध असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले. 

‘द-बॅंग द टूर’ची एक झलक दाखवणारा व्हिडिओही नुकताच प्रसिद्ध झाला असून, हा व्हिडिओ पाहण्यासाठी क्‍लिक करा -
https://www.facebook.com/SakalNews/videos/ 10155658689771973/ 
https://twitter.com/eSakalUpdate/status/  974247541674950656
https://youtu.be/OGYxbx_-YLc

Web Title: Marathi News Pune News Salman Khan Concert In Pune Dabangg Tour Flash Mob