मराठी विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसायाचे ध्येय ठेवुन शैक्षणिक  वाटचाल करावी

रमेश मोरे
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

जुनी सांगवी (पुणे) : मराठी तरुण विद्यार्थ्यानी स्वतःचा व्यवसाय करायचे स्वप्न ठेऊन पुढील वाटचाल करावी. सरकारी नोकरी मिळेलच याची आताच्या युगात शाश्वती नाही. म्हणून दहावी व पुढील वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने स्वतःच्या आवडीनुसार विषयाची निवड करावी असे जुनी सांगवी येथील कै.सौ.शकुंतलाबाई शितोळे संयुक्त नुतन माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलताना समर्थ उद्योग समुहाचे विठ्ठलराव ढवळे यांनी मत व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  पिंपरी चिंचवड शहर व जिव्हा कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे हे होते.या प्रसंगी जयश्री गुरव, माहिती अधिकार समितीचे अध्यक्ष नितीन यादव ,उद्योगपती बंडोपंत थोरवत, सोमनाथ कोरे, डॉ.दिलीप गरुड, संस्थेचे सतीश साठे, परशुराम मालुसरे, बाळासाहेब मोहिते, विलास थोरवत, दादासाहेब मगर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी माने यांनी प्रास्ताविक केले. तर आभार भाऊसाहेब दातीर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी भाऊसाहेब दातीर सुनीता टेकवडे, हेमलता नवले, मनीषा लाड, सीमा पाटील, स्वप्नील कदम , सुनीता मगर , मानसी माळी , संदीप भुसारे , दीपाली झणझणे , श्रध्दा जाधव , संगीता सूर्यवंशी , नीता ढमाले , शोभा वरठि , पल्लवी तायडे , सुचीता पवार , पूजा ढमढरे , ममता सावंत , सीमा जगताप , प्रियंका लान्डे , शीतल नाईक , दिशा क्षीरसागर, राणी तरंगें, निर्मला भोइटे ,कुसुम ढमाले , चेतना इंगले , मनिषा गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Marathi news pune news sangavi