पुणे - जुनी सांगवीत तरूणाने निराशेपोटी घेतली पवनानदीत उडी

रमेश मोरे
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील मैला शुद्धीकरण केंद्राजवळ दुपारी चारच्या सुमारास निराशेपोटी येथील तरुणाने पवना नदीत निराशेपोटी उडी मारली. हा तरूण  सांगवीतील जयमाला नगर येथील असल्याचे नदीकाठावरील व्यवसायिक नागरीकांनी सांगितले. तर काठावर त्याची बॅग आढळून आल्याने त्याचे नाव अक्षय गेरबा ढोणे (वय २६) असे कळाले असल्याचे निष्पन्न झाले आहे.  

अक्षय ट्रॅव्हल दुकानात खाजगी नोकरी करत होता व घरातून कामासाठी जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला होता. नदीत उडी मारण्या अगोदर काही तरुणांनी त्यास बघितले त्यामुळे सदर घटना लक्षात आल्याचे सांगितले. घटनास्थळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राजू सावळे यांनी तात्काळ आपत्कालीन व्यवस्थापनास कळवले. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सांगवी पोलिस व  अग्निशामक दलाकडुन शोधकार्य सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते राजु सावळे हे तरूणास  ओळखत असल्याचे सांगितले. त्याच्या बॅगेतुन काही कागदपत्रे  मिळाली असून पुढील तपास सांगवी पोलिस करत आहेत.

Web Title: Marathi news pune news sangavi suicide boy jummp pawna river