पुणे-जुनी सांगवीत शिवजयंती उत्सव, भव्य मिरवणुकीची तयारी

रमेश मोरे
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

जुनी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत आज विविध सामाजिक संस्था, मित्र मंडळांच्या वतीने संयुक्त शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. शिवजयंती उत्सवानिमित्त सांगवी परिसरात ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे. तर प्रमुख चौकांमधुन भगवे ध्वज लावुन सुशोभिकरण करण्यात आले आहे.

सायंकाळी ६ वाजता येथील शितोळेनगर गणपती मंदीरापासुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणुक काढण्यात येणार अाहे. येथील महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानात मिरवणुकीची सांगता करण्यात येणार आहे. या दरम्यान जेष्ठ इतिहास संशोधक अॅड. अनंत दारवटकर यांचा सांगवीकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या उत्सवास संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष अभिमन्यु पवार, डॉ. राजाभाऊ भैलुमे उपस्थित राहणार आहेत. या संयुक्त शिवजयंती उत्सवाचे येथील समता बुद्ध विहार, बहुजन क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिवमुद्रा प्रतिष्ठाण,जगदंब महिला मंडळ, सावित्रीबाई फुले महिला संस्था, प्रियदर्शनी नगर मित्र मंडळ, विश्वरत्न सोशल ग्रुप, फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन, पंचशील धम्म ग्रुप, माता रमाई महिला मंडळ, जय महाराष्ट्र गुजराथी संघ इत्यादींनी आयोजन केले आहे.

सांगवी व परिसरातील तमाम नागरीकांनी या शिवजयंती उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन संयुक्त शिवजयंती उत्सवाचे मुख्य प्रवर्तक नगरसेवक संतोष कांबळे, सुर्यकांत ऊर्फ कांता कांबळे, बहुजन क्रांती मोर्चाचे सुर्यकांत वराडकर, मराठा सेवा संघाचे पंकज पाटील, संभाजी ब्रिगेडचे अजय भोसले आदींनी केले आहे.

Web Title: Marathi news pune news sangawi shivjayanti