पुणेकर रसिकांसाठी संगीत नाटके अन्‌ चैत्रपाडवा पहाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

पुणे - मराठी रंगभूमीची जननी असलेल्या संगीत नाटकांच्या परंपरेला उजाळा देण्यासाठी आणि तरुण पिढीला उत्तमोत्तम संगीत नाटके पाहायला मिळावीत यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने विशेष संगीतनाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. नाट्य रसिक आणि समीक्षकांनी पसंतीची मोहोर उमटविलेल्या ‘संगीत मानापमान’, ‘संगीत संशय कल्लोळ’ या संगीत नाटकांचे प्रयोग या महोत्सवात होणार आहेत. त्याचसोबत संगीताची मेजवानी देणारा ‘चैत्र पाडवा पहाट’ हा कार्यक्रमही १८ मार्चला सकाळी सहा वाजता होणार आहे. पु. ना. गाडगीळ (नळ स्टॉप) हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. हे सहप्रायोजक आहेत.

संगीत नाटकाची मुहूर्तमेढ सांगली येथे रोवली गेली. सांगली आणि गाडगीळ यांचे नाते फार जुने आहे. त्यामुळे या संगीत नाटकांना आमचा कायम पाठिंबा आहे. पुणेकरांशीही गाडगीळांचा ऋणानुबंध आहे. मराठी रंगभूमीची जननी असलेल्या या संगीत नाटकांच्या परंपरेला उजाळा देण्यासाठी, आजच्या तरुण पिढीला उत्तमोत्तम संगीत नाटके पाहायला मिळावीत तसेच अभिरुचीसंपन्न पुणेकरांच्या अभिरुचीचा आदर म्हणून संगीतनाट्य महोत्सवाचे प्रयोजन केले आहे.
- अभय गाडगीळ, संचालक, पु. ना. गाडगीळ, नळस्टॉप.

पुण्यामध्ये संगीत नाटकांची जुनी परंपरा आहे. संगीत, संगीत नाटके या सगळ्याला पुणेकर रसिक दाद देतात. ही जुनी परंपरा टिकायला हवी तसेच या पिढीला या परंपरेची ओळख व्हायला हवी यासाठी ‘सकाळ’तर्फे होत असलेला हा संगीत नाट्यमहोत्सव कौतुकास्पद आहे.
- सुशील जाधव, झोनल मॅनेजर, लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.

दर्जेदार अभिनयाची व नाट्यसंगीताची मेजवानी देणाऱ्या या महोत्सवासाठी संपूर्णोत्सव प्रवेशिका
रु. ४०० तर प्रत्येक दिवसासाठी रु. २०० व १०० रुपये (बाल्कनी) असे प्रवेशमूल्य आहे.
फोनवर व ऑनलाइन बुकिंगही सुरू आहे.

‘सकाळ’ संगीतनाट्य महोत्सव
गुरुवार (ता.१५) - ‘संगीत मानापमान’ (राहुल देशपांडे व प्रियांका बर्वे) 
शुक्रवार (ता.१६) - ‘संगीत संशयकल्लोळ’ (राहुल देशपांडे व प्रशांत दामले) 
रविवार (ता.१८) - चैत्र पाडवा पहाट (राहुल देशपांडे) 
कुठे - टिळक स्मारक मंदिर, पुणे 
केव्हा - गुरुवार (ता. १५) व शुक्रवार (ता. १६) रात्री ९.३० वाजता 
चैत्र पाडवा पहाट - रविवार (ता. १८) सकाळी ६ वाजता  
प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण व वेळ -
टिळक स्मारक मंदिर  (सकाळी ९ ते ११.३०) व (संध्याकाळी ५ ते ८), पु. ना. गाडगीळ (नळस्टॉप) (सोमवारी बंद), लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, केसरीवाडा, नारायण पेठ, पुणे (स. ११ ते सायं. ५) 

ऑनलाइन बुकिंगसाठी - ticketees.com 
अधिक माहितीसाठी संपर्क - ९५९५८३०५५५ 

Web Title: marathi news pune news Sangeet Natya Mahotsav