आरोग्य जागर कार्यक्रमात संक्रांतीचे वाण म्हणून सॅनिटरी पॅडचे वाटप

चिंतामणी क्षीरसागर
सोमवार, 15 जानेवारी 2018

वडगाव निंबाळकर (पुणे) : मुलांचे छंद किंवा सवयी स्वयंभु तयार होत नसतात, त्या कोणाच्या तरी प्रभावातून किंवा अनुकरणातून जन्माला येतात मुले समाजात वाढतात आणि संगतीत घडतात. घरातील, शाळेतील वातावण संस्कारी असले तर मुलांचा व्यक्तीमत्व विकास होईल असे मत अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले. होळ (ता. बारामती) येथील आनंद विद्यालयातील किशोरवयीन मुली व मातापालकांसाठी आरोग्य जागर कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. उपस्थित मुली व माता पालकांना संक्रांतीचे वाण म्हणून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. 

तालुक्यातील विविध शाळेतील मुली व माता पालकांना महिलांचे आरोग्य या विषयावर सुनंदाताई मार्गदर्शन करतात. व सॅनिटरी पॅडचे वाटप करतात. यावेळी येथील सरपंच स्नेहा सिद्धार्थ गिते, आनंद शिक्षण संस्थेचे सचिव प्रमोदकुमार गिते, सरिता गिते, मुख्याध्यापक वसंत वसेकर दिपक होळकर उपस्थीत होते. पवार पुढे म्हणाल्या की, काळ मोठा कठीण आहे. मुलांमधे सद्गुणांची जोपसना करणे हे पालकांचे शिक्षकांचे सर्वात मोठे काम आहे. दररोजच्या कामाच्या घाईत आपण मुलांकडे लक्ष देत नाही. मुले कोणाच्या संगतीत आहेत. दिवसभर कुठे जातात काय करतात बरोबर कोण कोण असते याची सविस्त माहीती पालक म्हणून आपल्याला असली पाहीजे. वाईट संगतीमुळे व्यसनांच्या आहारी मुले जातात यामुळे आयुष्याची माती होते. नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. तर चांगल्या संगतीतून सवयी चांगल्या लागतात आयुष्याचे सोने होते. मुलींच्या माता पालकांनी आपल्या पाल्याशी मैत्रीचे संबध ठेवा सर्व गोष्टींवर दिलखुलास चर्चा केली पाहीजे. मुलांची चौकस बुद्धी असते त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली नाहीत तर ते वेगळ्या मार्गाने उत्तरे शोधतात. बाह्य वातावरणाचा परिणाम मुलांवर होतो. जास्त करून टिव्हीच्या मालीका मुलांच्या मनावर परिणाम करतात. 

पालकांनी सुरूवातील आपली मर्यादा ओळखली पाहीजे. अभ्यासाच्या वेळेत टिव्ही चालू केला तर कसे होईल? पालकांनी शिस्त बाळगली की, मुले आपोआप शिस्तीत वागतील. मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पालकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. असे पवार यांनी सांगितले. मुलींच्या आरोग्य विषयावर चर्चा करताना मुलींना बोलते करून शंकाचे सामधान केले. 

Web Title: Marathi news pune news sanitary pad distribution in school