सांगवीत श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यास सुरूवात

रमेश मोरे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

या सप्ताहा निमित्त मंगळवार (ता. ६) विष्णु महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेद आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात वनस्पती परिचय, आहार, विविध रोगाविषयी माहिती व गो शाळेतील औषधे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तर गुरूवार ता.८ विविध आयुर्वेदीक काढे, ज्युस तयार करून मोफत वाटप करण्यात येणार आहे.

पुणे : जुनी सांगवी येथील प.पु. अवधुत बालयोगी नंदकुमार महाराज यांच्या विसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त दत्तआश्रमात अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत  तुकाराम महाराज गाथा  पारायण सोहळ्याची सुरूवात करण्यात आली.

श्री. ह. भ .प.शांतीब्रम्ह मारूतीबाबा कु-हेकर यांच्या शुभहस्ते गाथा पुजन व वीणा पुजन करण्यात आले. यावेळी ह.भ.प.माधव महाराज इंगोले यांच्या हस्ते कलश पुजन व टाळ पुजन करण्यात आले. या अखंड हरिनाम सप्ताहात बुधवार (ता.२८) सायं.श्री कान्होबा महाराज देहुकर, गुरूवार ता.१ श्री.बाबा महाराज बो-हाडे लातुरकर, शुक्रवार (ता.२) वेदांताचार्य श्री लक्ष्मण महाराज चव्हाण सोलापुरकर,शनिवार (ता.३) श्री लक्ष्मण महाराज कोकाटे काटेवाडीकर,रविवार (ता. ४) ह.भ.प.शांताब्रम्ह मारूतीबाबा कु-हेकर, सोम.ता.श्री.संत भारतीदास महाराज कोठाळकर यांचे सायं ७ ते ९ किर्तन होणार आहे.

मंगळवार (ता. ६) सकाळी भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांचे काल्याचे किर्तन होईल. दुपारी १ ते ३ महाप्रसाद  याचबरोबर सोमवार (ता.५) मार्च सालाबादप्रमाणे सायंकाळी दिंडी मिरवणुक काढण्यात येणार आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी प.पू.बालयोगी नंदकुमार महाराज यांच्या जयंती निमित्त तपपुर्ती सोहळा व प्रवचन सेवा होईल. या सप्ताहा निमित्त मंगळवार (ता. ६) विष्णु महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेद आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात वनस्पती परिचय, आहार, विविध रोगाविषयी माहिती व गो शाळेतील औषधे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तर गुरूवार ता.८ विविध आयुर्वेदीक काढे, ज्युस तयार करून मोफत वाटप करण्यात येणार आहे. या शिबिरादरम्यान संपुर्ण आरोग्याविषयीचे आहार सत्र नियमावली व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Web Title: marathi news Pune news Sant tukaram