ससूनची ‘नेत्रसेवा’ महापालिकेच्या दवाखान्यात

Marathi News Pune News Sasoon Hospital Eye checkup
Marathi News Pune News Sasoon Hospital Eye checkup

येरवडा - ससून सर्वोपचार रुग्णालयातील ‘नेत्रसेवा’ आता महापालिकेच्या सात दवाखान्यात उपलब्ध होणार आहे. यासह ‘राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम’ अंतर्गत शहर व उपनगरातील रुग्णांना नेत्र तपासणी पासून ते नेत्र उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्र शस्त्रक्रिया सुद्धा होणार असल्याची माहिती उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली. 

बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय येथील नेत्र विभागातर्फे महापालिकेच्या सात दवाखान्यांमध्ये नेत्र तपासणी व उपचार केले जाणार आहेत. ‘राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम’ अंतर्गत जिल्हा नेत्र चिकित्सक यांच्या सहकार्याने महानगरपालिकेतील रुग्णांवर ससूनमध्ये शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. येरवड्यातील राजीव गांधी रुगणालय, कोथरूड येथील सुतार दवाखाना, वारजे माळवाडी येथील बराटे दवाखाना, गुरूवार पेठेतील गोटीराम काची दवाखाना, भवानी पेठेतील साेनवणे प्रसुतिगृह, एरंडवणा येथील थरकुडे दवाखाना, वानवडी येथील छत्रपती शाहू दवाखाना या ठिकाणी ससूनच्या वतीने नेत्रसेवा उपलब्ध होणार आहे. 

पुणे महानगरपालिकेच्या विविध दवाखान्यात नेत्रसेवा पुरविण्याचा मानस ससून रुग्णालयाने दर्शविला होता. यासह सर्व प्रभागात नेत्र चिकित्सा शिबीर घेण्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पत्र ससून सर्वोपचार रुग्णालयाने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले होते. महापालिकेच्या दवाखान्यात ससून मार्फत नेत्रतज्ज्ञ उपलब्ध करुन दिल्यास स्थानिक रुग्णांना त्याचा फायदा होणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते, असे डॉ. धेंडे यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात नेत्र उपचाराची अत्यंत आवश्‍यकता होती. त्यामुळे नेत्रसेवेचा विस्तार होणे गरजेचे होते. त्या हेतूने महापालिकेच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या दवाखान्यांमध्ये नेत्रसेवा उपलब्ध करीत असल्याचे ससून नेत्रविभागाच्या डॉ. संजीविनी आंबेकर यांनी सांगितले.

इन्फोबॉक्स शिरुरमध्ये सर्वात प्रथम नेत्रसेवा बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाच्या वतीने शिरूर येथे आठवड्यातून दोन दिवस रुग्णांना नेत्रसेवा दिली जाते. औषध वैद्यकशास्त्र विभाग तेथील रुग्णांची नेत्र तपासणी व उपचार करते. याशिवाय राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा नेत्र चिकित्सक ग्रामिणभागातील रुग्णांना ससूनमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल केले जातात. याच धर्तीवर उपनगरात रुग्णांना नेत्रसेवा मिळणार असल्याचे ससूनच्या नेत्र विभागाकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com