सासवडला घनकचरा संकलनात सॅनिटरी नॅपकिनचेही योग्य संकलन

श्रीकृष्ण नेवसे 
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

सासवड (पुणे) :सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे नगरपालिकेच्या वतीने घनकचरा संकलन घरोघरी जाऊन केले जाते. त्यातही घराघरातून निर्माण होणाऱया सॅनिटरी नॅपकिनच्या शास्त्रोक्त संकलनासाठी प्रत्येक कचरा संकलन वाहनांवर हायजीन बॉक्सची व्यवस्था करुन पालिकेने स्वच्छतेबाबत मोठी आघाडी घेतली आहे. मुख्याधिकारी विनोद जळक यांनी ही संकल्पना राबविली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून उर्वरीत घटकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही केले आहे. 

जळक यांनी म्हटले आहे की, शहरात प्रति महा 40 ते 45 हजार सॅनिटरी नॅपकीन्स कचऱयात जमा होतात. हे जमा होणारे सॅनिटरी नॅपकिन्स कचरा संकलनातील व तत्सम कामातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांच्या संपर्कात आल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्याशिवाय वापरलेली नॅपकीन घंटागाडीत न दिल्यास शहरात इतरत्र पडत होती. त्यातून सार्वजनिक आरोग्याचा पुन्हा प्रश्न डोके वर काढत होता. हे बारकाईने हेरुन मुख्याधिकाऱयांनी या बाबीचा अभ्यास केला. 

ही समस्या टाळण्यासाठी पालिकेने विज्ञान आश्रम, पाबळ यांच्याकडील सिध्देश साकोरे या विद्यार्थ्याच्या मदतीने पर्याय शोधला. पन्नास लिटर्स क्षमतेचा हायजीन बॉक्स तयार करुन शहरातील कचरा संकलनाच्या प्रत्येक घंटागाडीवर बसविला. या बॉक्समध्ये हायड्रोजन पॅराऑक्सईड या द्रव्याचा वापर केला. त्यामुळे वापरलेले सॅनिटरी नॅपकीनचे निर्जंतुकीकरण केले जाते. निर्जंतुकीकरण केल्यानंतर या नॅपकीनचे इन्सीरेशन करुन विल्हेवाट लावली जाते. पालिकेच्या पाच घंटागाड्या व एक ट्रॅक्टर आहे, त्यावर ही हायजीन बॉक्सची व्यवस्था केली आहे. कचरा संकलनातील हे आरोग्याच्या दृष्टीने हे सर्वात महत्वाचे पाऊल असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष विजय वढणे व नगरसेवकांनी स्पष्ट केले.  

Web Title: Marathi news pune news saswad waste management sanitary napkins