पुणे विद्यापीठाच्या वतीने शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

पुणे : नवोदित चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांना प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागाने शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात हा महोत्सव होईल. 

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग उद्‌घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत. नंतर 'फिल्म इन्स्टिट्यूट'चे विद्यार्थी प्रांतिक बसू यांचा 'सखीसोना' हा लघुपट दाखवला जाईल.

या लघुपटाला 46व्या रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'टायगर अवॉर्ड', तर मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा 'सिल्व्हर काउंच ऍवॉर्ड' मिळाले आहे. या दोनदिवसीय महोत्सवात विविध भाषा व विषयांवरील निवडक 30 लघुपट दाखविण्यात येतील. हा फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या उपस्थितीत 20 फेब्रुवारीला महोत्सवाचा समारोप होईल. 

Web Title: marathi news pune news savitribai phule pune university short film festival