'अल्ला माफ नही करेगा': शाहीदा अब्दुल करीम तेलगी

court
court

पुणे : देशात खळबळ उडवून टाकणाऱ्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा मास्टर माइंड, मुख्य सुत्रधार व नुकतेच निधन पावलेला मुख्य आरोपी अब्दुल करीम लाडसाब तेलगीची पत्नी व बनावट मुद्रांक घोटाळ्याच्या खटल्यात असलेली आरोपी शाहीदा अब्दुल करीम तेलगी (वय 57, सध्या रा. खानापुर, बेळगाव) हिने पुणे येथील विशेष मोका न्यायालयात सीबीआय ने बनावट मुद्रांक घोटाळ्याचा फेर तपास करून तिच्या पतीने म्हणजेच अब्दुल करीम लाडसाब तेलगीने 'बनावट मुद्रांक' घोटाळ्यातून कमावलेल्या पैशातून मोठ्या प्रमाणातील स्थावर मिळकती सीबीआयकडून आजही जप्त करावयाच्या राहील्या असुन त्या स्थावर मिळकती सीबीआयने फेर तपास व खातरजमा करून सरकार जमा कराव्यात असा अर्ज शाहीदा अब्दुल करीम तेलगीने तिचे वकील अॅड. मिलींद द. पवार, अॅड. प्रशांत शि. जाधव यांच्या वतीने पुण्यातील विशेष मोका न्यायालयात केला.

अब्दुल करीम लाडसाब तेलगीने देशात जवळपास 60 हजार कोटींचा बनावट मुद्रांक घोटाळा करून खळबळ माजवुन दिली होती. तेलगीच्या घोटाळ्याने तपास यंत्रणा व तत्कालीन सरकार पुढे मोठं आव्हान उभे केले होते. तेलगीच्या घोटाळ्याच्या व्याप्ती जवळपास 13 राज्यात पसरली होती. 

बनावट मुद्रांक घोटाळा गुन्ह्यात व खटल्यात अनेक बडे पोलीस अधिकारी,मोठे व्यावसायिक,मोठे राजकीय नेते यांना अटक होऊन जवळपास 60 हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याच्या अंदाज व्यक्त केला जात होता. पोलिस खात्यातील अधिकारी, व्यावसायिक, राजकीय नेते यांना तेलगीला बनावट मुद्रांक घोटाळा करण्यासाठी मदत केली या कारणास्तव अनेक उच्चपदस्थांना अटक करण्यात आली होती. 

शाहीदा तेलगी हिने देखील तीने तीचा पती व बनावट मुद्रांक घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगीला गुन्हा करणे कामी मदत केली असा तिच्यावर आरोप असुन खटल्याची सुनावणी अद्याप ही चालूच आहे. अब्दुल करीम तेलगीने पत्नी शाहीदा व जवळच्या नातेवाईकांच्या नावावर काही स्थावर मिळकती बनावट मुद्रांक घोटाळ्याच्या पैशातुन खरेदी केल्या व म्हणून शाहीदाने मुख्य आरोपी तेलगीला मदत केली असा आरोप ठेवून तीलाही सीबीआय ने बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणी अटक केली होती. 

बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी पुणे येथील विशेष मोका न्यायालयाचे न्यायाधीश श्री.एस एच ग्वालानी यांचे समोर सुरू आहे व सरकार पक्षाचे वतीने साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्याचे काम चालू आहे. खटल्यातील मुख्य आरोपी तेलगीचा 26/10/2017 रोजी न्यायालयीन कोठडीत बेंगलोर कारागृहात असताना निधन झाले. आरोपी शाहीदा तेलगी ही जामीनावर मुक्त असुन सध्या खानापुर,बेळगाव येथे मुळ गावी वास्तव्यास असुन ती देखील अनेक आजारांनी त्रस्त आहे.

तेलगीच्या मृत्यू नंतर कर्नाटक राज्यातील बेळगाव,खानापुर व इतर काही स्थावर मिळकती आहेत ज्या तेलगी ने खरेदी केलेल्या आहेत ज्याची आयकर विभागाकडे नोंदी आहेत त्यावर तेलगीने आयकर भरलेला आहे.कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर खरेदी केल्या आहेत.अशा सर्व स्थावर मिळकती सीबीआय ने फेर तपास व खातरजमा करून सरकारजमा करून जप्त करण्यात याव्यात.

शाहीदा ही देखील नेहमी आजारी असते, बनावट मुद्रांक घोटाळ्याशी तीचा काही एक संबंध नव्हता फक्त तीच्या पतीच्या दुषकृत्या मुळे तीलाही या खटल्यात गोवले गेले. अजुनही काही स्थावर मिळकती आहेत ज्या अद्यापही जप्त करण्यात आलेल्या नाहीत. "मी ही बाब लपवून ठेवली तर अल्ला मला माफ करणार नाही" या मिळकतिची खातरजमा करुन त्या सिबिआय ने जप्त करून देश हिता करिता वापर करावा या उदात्त हेतूने व सद्- भावनेने शाहीदा तेलगीने हिने अॅड मिलींद द पवार यांचे वतीने विशेष मोका न्यायालयात स्थावर मिळकतींच्या फेर तपास व सरकार जमा करून घेणे करिता अर्ज दाखल केला आहे. विशेष मोका न्यायालयाने या अर्जावर सीबीआय व सरकार पक्षाचे म्हणणे मांडण्यास सांगुन पुढील सुनावणी दि 3/2/17 रोजी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com