शरद पवार हे देशाला लाभलेले उत्तम प्रशासक - भाई वैद्य

संदिप जगदाळे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

हडपसर : यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर देशाला लाभलेले उत्तम प्रशासक म्हणून शरद पवार यांचे नाव घ्यावे लागेल. सर्व सामान्य लोकांशी नाते जोडणारे हे नेतृत्त असल्याने पवार हे खऱ्या अर्थाने लोकनेते आहेत. अॅड. राम कांडगे लिखीत लोकनेता शरद पवार या संदर्भ ग्रंथात शरदरावांनी देशाच्या विकासाच जे सर्वसमावेशक धोरण राबविले याचा आलेख आहे. त्यामुळे शरद पवारांच्या कार्याची व व्यक्तीमत्वाची सखोल ओळख व ज्ञान या ग्रंथातून निश्चीतपणे होईल. तसेच त्यांच्या कार्याचा चिकिस्तक अभ्यास या पुस्तकातून होईल, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले. 

रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविदयालयामध्ये माजी केंद्रीय कृषीमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अखंडित सुवर्ण महोत्सवी संसदीय कारकिर्दीनिमित आयोजीत चर्चासत्राचे उदघाटन व रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे चेअरमन अॅड. राम कांडगे लिखील लोकनेता शरद पवार या संदर्भ ग्रंथाच्या तिसऱाया आवृत्तीचे प्रकाशन कार्यक्रमात वैद्य बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर होते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॅा. अनिल पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, जगन्नाथ शेवाळे, विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, अॅड. राम कांडगे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जालिंदर कामठे, मिनाताई जगधने, विजय कोलते, भाउसाहेब कराळे, सतिश खोमणे, पोपटराव गावडे, प्राचार्य डॅा. अरविंद बुरूंगले, डॅा. अशोक भोईटे, डॅा, पांडूरंग गायकवाड, डॅा. शर्मीला चौधरी, चंद्रकांत जाधव, उत्तमराव आवारी, अशोक जगदाळे, उपस्थित होते. 

डॅा. पाटील म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकर आणि कर्मवीर भाउराव पाटील यांच्यानंतर बहुजनांना शिक्षण देण्याचे काम शरद पवार यांनी केले. काळाच्यापुढे जाउन शिक्षणाचा विचार करणारा, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक, डिजिटल कृषी, आयटी, उद्योग, संशोधन अशा सर्व स्तरावर शिक्षणाची उभारणी करणारा दूरदृष्टी ठेवणारे पवार साहेब आहेत. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे बहुमोल मार्गदर्शन संस्थेला लाभते.  

निंबाळकर म्हणाले, देशाच्या राजकारणात नव्हे तर सर्व क्षेत्रात वेगळी ओळख व दबदबा पवार साहेबांनी त्यांच्या कार्यातून निर्माण केला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे व देशाचे भवित्य घडविणारे, सर्वसामान्यांचा विचार करणारे, महिलांना आरक्षण देणारे, शेतकऱ्यांचा कैवारी असलेले पवार साहेब हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. एस. एम. जोशी महाविदयालयात आयोजीत केलेल्या चर्चासत्रामुळे त्यांचे कार्य व विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.

Web Title: Marathi news pune news sharad pawar bhai vaidya