थोरले बाजीराव कर्तबगारी, मुत्सुद्दीगिरीमुळे उत्कृष्ट प्रशासक

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 10 मार्च 2018

"बाजीरावने पर मुलखात जाऊन तेथील भौगोलिक परिस्थितीची जास्त माहिती नसताना देखील त्यांनी ३९ लढाया जिंकल्या. यातून त्यांनी छत्रपती शिवरायांचा योध्याचा वारसदार म्हणून ती जबाबदारी समर्थपणे सांभाळली." असे ही पित्रे यांनी सांगितले.

पुणे : थोरले बाजीरावांना त्यांच्या कर्तबगारीमुळे, मुत्सुद्दीगिरीमुळे व नेतृत्वगुणांमुळे वयाच्या २०व्या वर्षी पेशवेपद मिळाले, उत्कृष्ट प्रशासक म्हणून ख्याती मिळविली, त्यांच्या अशा कर्तुत्वामुळे उभ्या आयुष्यात एकही लढाई ते हरले नाहीत. अशी निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी दिली.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा 'वारजे' शाखेचा उदघाट्न समारंभ पार पडला. यानिमित्त शशिकांत पित्रे यांचे 'बाजीराव अजिंक्य योद्धा' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी आमदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे,  जिल्हाध्यक्ष आनंद दवे , नगरसेवक सुशील मेंगडे , नगरसेविका वृषाली चौधरी व नगरसेविका सायली वांजळे उपस्थित होत्या. 
ब्राह्मण समाजाच्या या २१व्या शाखा उदघाटन समारंभाला वारजे-कर्वेनगर भागातील मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण समुदाय उपस्थित होता. 

"बाजीरावने पर मुलखात जाऊन तेथील भौगोलिक परिस्थितीची जास्त माहिती नसताना देखील त्यांनी ३९ लढाया जिंकल्या. यातून त्यांनी छत्रपती शिवरायांचा योध्याचा वारसदार म्हणून ती जबाबदारी समर्थपणे सांभाळली." असे ही पित्रे यांनी सांगितले.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, 'समाज बांधवांचा प्रश्न येतो त्यावेळी, आपल्या समाजासाठी एकत्र या. पण देशाचा प्रश्न येईल. तेव्हा जात विसरा. ब्राह्मण समाजाने संघटित होऊन देशासाठी लढावे.'

या समारंभाला देशपांडे व दवे यांनी ब्राह्मण शाखेच्या देशभरातील विस्ताराबद्दल माहिती दिली. समारंभाचे प्रास्ताविक रेश्मा पाटणकर , सूत्रसंचालन केतकी कुलकर्णी व आभार विवेक चावजी यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन माधुरी पाठक, सुयोग नरवणे व मंदार रेडे यांनी केले होते.

Web Title: Marathi news Pune news Shashikant Pitre statement