शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर दीपोत्सव

दत्ता म्हसकर
शनिवार, 3 मार्च 2018

जुन्न (पुणे) : एक ज्याेत चारित्र्याची...एक ज्याेत निष्ठेची.. एक ज्याेत गड संवर्धनाची...एक ज्याेत पर्यावरण आणि जल संधारणाची... छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विविध गुणांप्रती नतमस्तक हाेत, शेकडाे ज्याेतींनी शिवजन्मस्थळ उजळून निघाले हाेते. निमित्त हाेते शिवजयंतीच्या निमित्ताने साजऱ्या झालेल्या दिपाेत्सवाचे. 

फाल्गुन वद्य तृतीया तिथीनुसार साजऱ्या हाेणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने शनिवारी (ता.२) सायंकाळी दिपाेत्सवाच्या आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने शिवजन्मस्थान उजळुन निघाले हाेते. 

यावेळी सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री म्हणाले,‘‘छत्रपती शिवाजी महाराज अनेक कलागुणांचे अजब रसायन हाेते. शिवाजी महाराजांचा प्रत्येक गुण प्रत्येकांच्या जीवनाला दिशा देणारा आहे. यामुळे पुढील पिढीसाठी शिवाजी महाराजांचा आदर्श निर्माण हाेण्यासाठी दरवर्षी दिपाेत्सवाचे आयाेजन केले जाते. प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा एक तरी गुण अंगी बाळगण्याची गरज आहे.‘‘ 

दिपाेत्सवा दरम्यान प्रथमेश धानापुने, मल्हार देशमुख, नील जुन्नरकर, पंकजा उपासणी या विद्यार्थ्यांनी पाेवाडे, शिवस्फुर्ती गीते, एेतिहासीक नाट्यछटा सादर केल्या. कार्यक्रमाला शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे, सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे पदाधिकारी राहुल जाेशी, गणेश खत्री, धनंजय कुलकर्णी, जितेंद्र देशमुख यांच्यासह शाम श्राेत्री आदि उपस्थित हाेते. 

Web Title: Marathi news pune news shivajayanti dipotsav