शिवनेरीवर तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा

दत्ता म्हसकर
रविवार, 4 मार्च 2018

शिवजन्मस्थळी पारंपरिक पध्दतीने महिलांनी मान्यवरांच्या उपस्थित पाळणा म्हणून शिवजन्म सोहळा साजरा केला. या नंतर ध्वजारोहण व धर्मसभा झाली. यावेळी रेश्मा कोकणे यांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जुन्नर : शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने किल्ले शिवनेरीवर आज (रविवार) फाल्गुन वद्य तृतीया या तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

सकाळी जागतिक युवा तत्त्वज्ञान परिषदेचे युवा तत्वज्ञ लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी सपत्नीक शिवाई मातेस अभिषेक केला. यावेळी समितीचे अध्यक्ष हेमंत मावळे, मधुकर काजळे व शिवप्रेमी उपस्थित होते. यानंतर पारंपारिक वाद्याच्या गजरात, बाल वारकऱ्यांच्या टाळ, मृदुगांच्या साथीत शिवाई मंदिरा पासून शिवजन्मस्थान पर्यंत छबिना पालखी मिरवणूक काढण्यात आली.

शिवजन्मस्थळी पारंपरिक पध्दतीने महिलांनी मान्यवरांच्या उपस्थित पाळणा म्हणून शिवजन्म सोहळा साजरा केला. या नंतर ध्वजारोहण व धर्मसभा झाली. यावेळी रेश्मा कोकणे यांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पायथ्याशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Marathi news Pune news Shivaji Maharaj jayanti