शिवरायांचा पुतळा लोकवर्गणीतूनच उभारणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

पुणे - लोकवर्गणीतूनच कॅंटोंन्मेंट बोर्डाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, असा निर्णय बोर्डाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. लवकरच याचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी दिली.

बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर राजीव सेठी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. उपाध्यक्ष अतुल गायकवाड, सदस्य रूपाली बिडकर, दिलीप गिरमकर, विवेक यादव, डॉ. किरण मंत्री, लष्करी अधिकारी कर्नल चेतन वासुदेव, कर्नल एस. पी. भोसले, कर्नल ए. पी. सिंग आणि डॉ. यादव  उपस्थित होते.

बोर्डाच्या आवारात लोकवर्गणीतूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या ठरावास गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली होती. यासाठी गायकवाड आणि गिरमकर यांनी पुढाकार घेतला होता. या पुतळ्यासाठी झालेला खर्चाची परतफेड करण्यासाठी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देऊ केला आहे. या योगदानाबद्दल सेठी आणि यादव यांनी सर्वांचे आभार मानले. पुतळा उभारण्यासाठी नियमानुसार ज्या परवानग्या लागतात त्या जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तालय कार्यालयाकडून प्राप्त होताच पुतळ्याचे अनावरण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल, असेही यादव यांनी सांगितले.

Web Title: marathi news pune news shivaji maharaj pune cantoment