'मराठा लाइट इन्फंट्री'साठी पुण्यात साकारला 'शिवरायांचा पुतळा' ! 

यशपाल सोनकांबळे, मोहन पाटील 
शनिवार, 17 मार्च 2018

दोन महिन्यांत काम फत्ते 
मध्य प्रदेशातील महू येथे असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या लष्करी संग्रहालयामध्ये लष्करी अधिकाऱ्यांचे पुतळे, समूहशिल्पे धोंडफळे यांनी बनविली आहेत. ते पाहून मध्य प्रदेशच्या सहाव्या मराठा लाइट इन्फंट्री बटालियनच्या कर्नल पाटील यांनी पुण्यात वास्तव्यास असलेल्या धोंडफळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार दीड ते दोन महिन्यांमध्ये धोंडफळे यांच्या तीन जणांच्या टीमने शिवरायांचा रंगीत सहाफुटी पुतळा साकारला. 

पुणे : मध्य प्रदेशातील सागर गावामध्ये असलेल्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या सहाव्या मराठा बटालियनसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा फुटी पुतळा पुण्यात तयार करण्यात आला आहे. फायबर ग्लासपासून बनविलेला हा पुतळा वजनाने हलका असल्याने मराठा बटालियन ज्या ठिकाणी जाईल, त्याठिकाणी तो नेता येणार असल्याचे शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. शनिवारी (ता. 17) रेल्वेने हा पुतळा मध्य प्रदेशला रवाना होणार आहे. 

दोन महिन्यांत काम फत्ते 
मध्य प्रदेशातील महू येथे असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या लष्करी संग्रहालयामध्ये लष्करी अधिकाऱ्यांचे पुतळे, समूहशिल्पे धोंडफळे यांनी बनविली आहेत. ते पाहून मध्य प्रदेशच्या सहाव्या मराठा लाइट इन्फंट्री बटालियनच्या कर्नल पाटील यांनी पुण्यात वास्तव्यास असलेल्या धोंडफळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार दीड ते दोन महिन्यांमध्ये धोंडफळे यांच्या तीन जणांच्या टीमने शिवरायांचा रंगीत सहाफुटी पुतळा साकारला. 

या पुतळ्याबद्दल धोंडफळे म्हणाले, ""इराण, दिल्ली, काठमांडूमध्ये अनेक ठिकाणी पुतळे, तसेच शिल्पसमूह तयार केले आहेत. मध्य प्रदेशातील लष्करी संग्रहालयातही लष्करी अधिकाऱ्यांचे पूर्णाकृती व अर्धपुतळे, तसेच विविध शिल्पसमूह मी बनविले आहेत. त्यामध्ये फिल्डमार्शल माणेकशॉ, मेजर जनरल करिअप्पा, जनरल राजेंद्र सिंह, जनरल मुकुंद वरदराजन आणि लेफ्टनंट जनरल नथूसिंह यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचा समावेश आहे. महू येथील लष्करी संग्रहालयात पुतळे आणि समूहशिल्पे पाहून मराठा लाइट इन्फंट्रीचे कर्नल पाटील यांनी संपर्क साधला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सहाफुटी पण वजनाने हलका, पाण्याने धुता येणारा, कोणत्याही वातावरणामध्ये काही फरक पडणार नाही असा आणि न तुटणारा पुतळा बनविण्यास सांगितले. त्यानंतर दीड ते दोन महिन्यांमध्ये 50 किलो वजनाचा छत्रपतींचा पुतळा साकारण्यात आला आहे. शनिवारी (ता. 17) पुणे रेल्वे स्थानकावरून जवानांसोबत हा पुतळा मध्य प्रदेशला रवाना केला जाणार आहे.'' 

Web Title: Marathi news Pune news Shivaji Maharaj statue maratha light infantry