शिवजयंतीसाठी विद्यार्थ्यानी बनविले आकाशकंदील  

दत्ता म्हसकर
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

जुन्नर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेल्या जुन्नर तालुक्यात दसरा दिवाळी प्रमाणे शिवजयंती उत्सव घरोघरी साजरा व्हावा यासाठी शिवप्रेमी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी नारायणगाव, गुंजाळवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीप्रमाणे घरोघरी लावण्यासाठी शिवजयंतीचे आकाश कंदील बनविले आहेत.

नारायणगाव येथील रमेश हांडे, संजय वाजगे, कमल पटेल, विजय नढे, महेश काळे, राजेश, रुपेश, ऋषिकेश वाजगे यांनी या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न सुरू केले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

येत्या शिवजयंतीला घरासमोर सडा घालावा रांगोळी काढावी. घरात शिवाजी महाराजांची प्रतिमा अथवा छोटी मूर्ती आणून तिचे पूजन करावे. जिजाऊ वंदना म्हणावी. यादिवशी शिव चरित्राची पुस्तके भेट म्हणून द्यावीत. घरात मिष्टान्न करावे. घराघरात शिवजयंती बरोबर मनामनात शिवविचार रुजवावेत अशा प्रकारचे आवाहन या उपक्रमांतर्गत करण्यात आले आहेत. 

Web Title: marathi news pune news shivjayant lantern diwali