किल्ले शिवनेरीवर स्वच्छता अभियान

दत्ता म्हसकर
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

जुन्नर (पुणे) : शिवजयंतीचे औचित्य साधून जुन्नर तालुका पत्रकार संघ निसर्ग रम्य जुन्नर तालुका परिवार व "शिवाजी ट्रेल" यांच्या संयुक्त विद्यमाने  किल्ले शिवनेरी वरील दुर्लक्षित साखळदंड मार्ग व लेणींमध्ये स्वच्छता अभियान रविवारी (ता.11) आयोजित करण्यात आले होते. यात पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील महाराज ग्रुपच्या 25 सदस्यांनी उस्फूर्त सहभाग घेतल्याने यशस्वी झाले. 

स्वच्छता अभियानाचा शुभारंभ शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या पंचालींग चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ सकाळचे बातमीदार दत्ता म्हसकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी शिवरायांना  पुष्पहार अर्पण करून  शिववंदना झाली. आमदार शरद सोनवणे यांनी स्वच्छता अभियानासाठी शुभेच्छा दिल्या. शिवसृष्टी येथील स्वच्छता राबवून सर्वजण दुर्लक्षीत लेण्यांची स्वच्छता करत साखळदंड मार्गाने किल्ले शिवनेरी वर पोहचले.

शिव जन्मस्थानी प्रार्थना करून अभियानाची सांगता झाली. यावेळी शिवनेरी व जुन्नर  तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू यांची सखोल माहिती  "निसर्गरम्य जुन्नर तालुका"  परिवाराचे  माजी सैनिक व शिवाजी ट्रेल चे उपाध्यक्ष रमेश खरमाळे यांनी दिली. पत्रकार मीननाथ पानसरे, नितीन ससाणे, सुभाष भोर तसेच महाराज ग्रुपचे शुभम खिलारी, अक्षय नाळे, अतुल महाडिक अजिंक्य भोर,हर्षल रेडेकर, अश्विन ढमाले आदी युवक स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. 

Web Title: Marathi news pune news shivneri fort cleaning