किल्ले शिवनेरीच्या कडेलोट टोकाला आग

दत्ता म्हसकर
गुरुवार, 25 जानेवारी 2018

जुन्नर : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी ता.जुन्नर येथील कडेलोट टोकाच्या खालील बाजूस कंपार्टमेंट नंबर ८५ मध्ये गुरुवार (ता. २५) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. 

मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने आग विझवण्यात यश आले. आग तातडीने विझल्यामुळे वनक्षेत्राची मोठी हानी टळली. याबाबत किल्ले शिवनेरीच्या कडेलोट टोकाखालील कंपार्टमेंट नंबर ८५ मधील दहा गुंठे वनक्षेत्राला आग लागली. ही बाब वनविभागाच्या निदर्शनास आल्यांनंतर उपवनसरंक्षक अर्जुन म्हसे-पाटील आणि वनपरिक्षेत्र अधिकारी जयंत पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर वनविभागाचे वनपाल कृष्णा दिघे, रमेश खरमाळे, शशिकांत मडके, संजय गायकवाड व वनमजूर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने आगीमुळे वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. 

Web Title: Marathi News Pune News Shivneri Fort Corner Fire