पुणे - पिंपरीत दुकानदाराचा बालिकेवर बलात्कार 

संदीप घिसे 
गुरुवार, 1 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : दुकानात बिस्किट आणण्यासाठी गेलेल्या एका तेरा वर्षांच्या बालिकेवर दुकानदाराने बलात्कार केला. ही घटना बुधवारी (ता. २८) सकाळी मोशी येथे घडली.
वैभव मल्लिकार्जुन एकलारे (वय १९रा खान्देशनगर, मोशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बालिका बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास बिस्किट आणण्यासाठी वैभव किराणा स्टोअरर्स येथे गेली होती. तेव्हा आरोपीने तिला कुत्रा चावेल असे म्हणत दुकानात ओढून घेतले. त्यानंतर शटर लावून तिच्यावर बलात्कार केला. घरी गेल्यावर तिने ही घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आईने पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत फिर्याद दिली. घटनेची माहिती होताच पोलिसांनी तात्काळ आरोपी वैभव याला अटक केली. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वसंत मुळे करीत आहेत.

Web Title: Marathi news pune news shopkeeper raped small girl