पुणे : शॉर्टसर्किटमुळे चारचाकी गाडीला आग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

पुणे : सहकारनगर येथील संतनगर भगीरथ सोसायटी येथे सकाळी अकरा वाजता पार्किंग मधील एमएससीबीचे मिटर शॉर्टसर्किट झाल्याने जळून खाक झाल्याने पार्किंगमध्ये लावलेली प्रफुल्ल जोशी यांच्या चारचाकी गाडीला आग लागली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

कात्रज अग्निशामक दलातील फायरमन संदीप गडशी, जयश लबडे, रुपेश जांभळे, भरत भारती, देवदूत रोहित जाधव, प्रतिक शिर्के यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली यामुळे सोसायटीतील मोठे नुकसान टळले. या घटनेची सहकारनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Marathi news pune news short circuit car fire