गरजू व्यक्तीला मदत पोचली की समाधान : श्रीनिवास पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

खडकवासला - "ज्याला गरज आहे, त्याच्यापर्यंत मदत पोहचली आणि त्याचा योग्य वापर झाला की खऱ्या अर्थाने मदत करणाऱ्याला समाधान मिळते. साधी एक सायकल. पण ती अनेकांचे आयुष्य बदलू शकते ही गोष्ट परिवर्तन संस्थेच्या सायकल अभियानाने सिद्ध केली आहे', असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

नांदेड (ता. हवेली) येथील परिवर्तन संस्थेच्या सायकल अभियान अंतर्गत दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले जाते. यावेळी पाटील यांच्या समवेत त्यांच्या पत्नी रजनी पाटील, संस्थेचे अध्यक्ष अभिजित घुले आणि नांदेड गावचे सरपंच गुलाब देडगे व्यासपीठावर उपस्थित होते. "चांगल्या कामासाठी आपल्या खिशात हात घालायला शिका. गरज असणाऱ्या पर्यंत मदत पोहचविण्याची जबाबदारी परिवर्तन संस्थेची आहे. असे सांगून पाटील यांनी त्यांच्या शासकीय, राजकीय, सामाजिक जीवनातील घटना सांगितल्या. संस्थेच्या वतीने 50 सायकली पुरंदर तालुक्‍यातील दिवे येथील कतोबा हायस्कुल, नारायण महाराज विद्यालय हिवरे, सरस्वती विद्यालय अंबवणे, शिवाजी विद्यामंदिर आबळे ह्या शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना ह्या सायकली देण्यात आल्या. प्रस्ताविक सुनील मते, आभार व सूत्रसंचालन देवा झिंजाड यांनी केले. किशोर ढगे, अशोक जाधव, समीर जाधवराव अनिकेत नलावडे, शशिकांत देवकर, शेखर वाल्हेकर, आंनद रोडे, सुधीर धावडे ह्यांनी ह्या कार्यक्रर्मासाठी विशेष मेहनत घेतली.

Web Title: marathi news pune news shriniwas patil