पदवीचे प्रमाणपत्र हे जाती धर्माचे नाही, तर ज्ञानाचे आहे

राजेंद्रकृष्ण कापसे
शुक्रवार, 2 मार्च 2018

वारजे माळवाडी (पुणे) : "मातेचे दूध, सत्य याला जात नसते. ज्ञानाला ही जात नसते. पदवीचे प्रमाणपत्र ही ज्ञानाचे आहे. ते कोणत्या जाती धर्माचे नाही." असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

वारजे माळवाडी (पुणे) : "मातेचे दूध, सत्य याला जात नसते. ज्ञानाला ही जात नसते. पदवीचे प्रमाणपत्र ही ज्ञानाचे आहे. ते कोणत्या जाती धर्माचे नाही." असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व वारजे माळवाडीतीळ संस्कार मंदिर महाविद्यालयात तृतीय पदवीदान समारंभात कला व वाणिज्य शाखेच्या यशस्वी विद्यार्थ्यांना सबनीस यांच्या हस्ते समारंभपूर्वक पदवी प्रदान करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते.  संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक दिलीप बराटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप भोईटे, सचिव विशाल थोरात, उपाध्यक्ष राजेंद्र कासार, परीक्षा प्रमुख डाॅ.राजेंद्र थोरात उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसमोरील समस्या कालानुरूप बदलत आहेत. सरकारी नोक-या दुर्मिळ होत चालल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रमाणे येत्या वर्षांनी विद्यार्थ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल की काय", अशी चिंता व्यक्त करीत सबनीस म्हणाले, पदवी हे समृद्ध आदर्श नागरिक होण्यासाठी दिले आहे. आता आपण आपल्याकडून अन्य लोकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी प्रयत्न करा. सकारात्मक जीवन जगताना समाजातील अंधकार दूर करावा.

महाविद्यालयाचे अध्यक्ष बराटे व प्राचार्य ड भोईटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.  समारंभाचे आयोजक व परीक्षा विभाग प्रमुख डाॅ राजेंद्र थोरात, प्रा.प्राजंली विद्यासागर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.  तसेच प्रा.संजय गिरी यांनी  आभार मानले. डाॅ स्वप्नील गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

Web Title: Marathi news pune news shripal sabnis