पुणे - इमारतीवरून पडल्याने बालिकेचा मृत्यू

संदीप घिसे 
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पिंपरी (पुणे) : खेळताना नवव्या मजल्यावरून पडून एका दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.२७) दुपारी चिंचवड येथे घडली. अनिका देवरत तोमर (वय दीड वर्ष, रा. मेट्रोपॉलिटन सोसायटी, लिंक रोड, चिंचवड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे.

चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिका ही दुपारी चार वाजताच्या सुमारास घरातील गॅलरीमध्ये खेळत होती. त्यावेळी तिची आई आजोबा आणि आजी घरात होते. खेळत असताना ग्रीलवरून तोल जाऊन पडल्याने ती नवव्या मजल्यावरून खाली पडली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे मेट्रोपॉलिटिन सोसायटीवर शोककळा पसरली. याबाबत अधिक तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.

Web Title: Marathi news pune news small girl fallen from building