स्मार्टसिटीच्या सायकल शेअरिंग नागरिकांचा प्रतिसाद

Cycle
Cycle

हडपसर (पुणे) : वाहतूक समस्या ही पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची समस्या आहे. पुण्यामध्ये दररोज ८०० पेक्षा अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नोंदणी होते. या वाढत्या वाहनसंख्येमुळे हवा प्रदूषण, आरोग्यावर दुष्परिणाम, अपघात, वाहतूक कोंडी आणि वाहतूक कोंडीमुळे वेळेचा अपव्यय अशा समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू केलेल्या सायकल शेअरींग योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचाच एक भाग म्हणून मगरपट्टा सिटीमधील नागरिकांना सायकल शेयरिंगसाठी ६०० सायकली भेट दिल्या आहेत. त्याचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा व प्रदूषण टाळावे व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करावी, असे अवाहन स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी केले. 

मगरपट्टा सिटी येथे स्मार्ट सिटी कंपनी व ओफो कंपनी यांच्यावतीनेसायकल शेअरिंग योजनेचा प्रारभं झाला, याप्रसंगी जगताप बोलत होते. याप्रलंगी मगरपट्टा सिटीचे कार्यकारी संचालक सतिश मगर, विरोधीपक्ष नेता चेतन तुपे, नगरसेविका हेमलता मगर, माजी उपमहापौर निलेश मगर, विकास रासकर, डॅा. शंतनू जगदाळे, प्रदीप मगर, प्रकाश फुलारे उपस्थित होते. 

सतिश मगर म्हणाले, मगरपट्टा सिटीत घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते, स्वच्छता सिटीकडून ठेवली जाते. त्यासाठी पालिकेकडून कोणतीही मदत घेतली जात नाही. मगरपट्टा सिटीची उभारणी करताना शरद पवार मुख्यमंत्री असताना कोणतेही अनुदान सिटीला मिळणार नसल्याची अट घातली होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासून सिटीतल्या नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यास आम्ही समर्थ आहोत.  सिटीमध्ये ८४०० कर्मचारी काम करतात. तसेच येथे आठ हजारहून अधिक सदनिका धारक आहेत. त्यामुळे महापालिकेने केवळ सिटी बाहेरील रस्ते रूंद करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यास मदत करावी.

चेतन तुपे म्हणाले, मगरपट्टा सिटीत सायकल शेअरिंग योजना सुरू झाल्याने सायकल प्रेमी खूष आहेत. मात्र ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी ईसायकलची आवश्यकता आहे. सायकल चालविणे हा त्यांचा हक्क आहे. यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने पुढाकार घ्यावा. स्मार्ट सिटी कंपनीने केवळ औंध, बाणेर आणि बालेवाडी या भागातच विकास केंद्रीत करू नये. हडपसर भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेवून हडपसर देखील स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. 

निलेश मगर म्हणाले, मगरटटा सिटी दरवर्षी २४ कोटीचा टॅक्स महापालिकेला भरते. महापालिकेकडून केवळ २५ टक्के पाणी सिटी घेते. हडपसर भागात गुन्हेगारांचे पुर्नवसन, गुराचे गोठे, कचरा प्रकल्प आणले जात आहेत. मगरपट्टा रस्ता रूंदीकरणासाठी आयुक्तांनी ५ कोटीचा निधी जाहिर केला होता. मात्र स्थायी समिती अध्यक्षांनी हा निधी निम्याने कमी केला. हडपसरचा झपाटयाने विकास होत आहे, त्यामुळे सत्ताधा-यांनी केवळ नको असलेले प्रकल्प हडपसरच्या माथी न मारता चांगले प्रकल्प या भागात आणायला हवेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com