व्यसनमुक्ती व सामाजिक सुरक्षा या विषयांवर चर्चासत्र

कृष्णकांत कोबल
शनिवार, 13 जानेवारी 2018

मांजरी (पुणे) : विद्यार्थ्यांनी ध्येयवादी राहण्याबरोबरच वेगवेगळे चांगले छंद जोपासले पाहिजेत. स्वतःची क्षमता ओळखून वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितपणे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांसारख्या व्यक्तिमत्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे मत स्त्री साहित्याच्या अभ्यासक डॉ. शोभा पाटील यांनी व्यक्त केले. 

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथील अरूण दादा बेल्हेकर युवा राष्ट्र निर्माण संस्थेच्या वतीने रस्ता सुरक्षा दल प्रशिक्षण शिबिरातील विद्यार्थ्यांसाठी "व्यसनमुक्ती व सामाजिक सुरक्षा" या विषयावर मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पाटील बोलत होत्या. रस्ता सुरक्षा दलाच्या जिल्हा समादेशक पी. एन. हरिभक्त, संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, डॉ. नाना झगडे, पृथ्विराज शिंदे, मुख्याध्यापक बी. यू.  गोसावी, प्रकाश रासकर, जयश्री तांबोळे, मसा जाधव आदी यावेळी उपस्थित होते. शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांसह सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने यावेळी मसाला दुधाचे वाटप करून व्यसनांपासून दूर राहण्यचे आवाहन करण्यात आले. उपस्थित मार्गदर्शक व विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. 

समादेशक हरिभक्त म्हणाल्या, "बाहेरच्या प्रलोभनांना बळी पडून स्रीच स्रीला मागे ओढत आहे. चार दोन जणांचे उदाहरण देऊन तरुणांना आम्ही दोष देत आहोत. मात्र तसे नाही. आजची तरूण पिढीही कष्टाळू, प्रामाणिक आणि सामाजिक जाणीव असलेली कित्येक उदाहरणावरून पाहायला मिळत आहे. देशाचे उद्याचे भविष्य ज्यांच्या हातात आहे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास देशाच्या महासत्तेचे आपले स्वप्न निश्चितच पूर्ण होईल." डॉ. झगडे व रासकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Marathi news pune news social security discussion