मुलांमधील उपलब्ध शक्तीचा अधिकाधिक वापर करून घ्यावा: कागणे

hadapsar
hadapsar

हडपसर : कर्णबधिर मुलांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थीक आणि वैदयकीय पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणले पाहिजे. यासाठी विशेष शाळा काम करतात. मात्र शासन आणि समाजाने देखील या कार्यात खारीचा वाटा उचलावा. या मुलांमध्ये अनेक सुप्त कलागुण दडलेले असतात. त्यांचा शोध घेवून या गुणांच्या विकासासाठी प्रयत्न वाढायला हवेत. या मुलांमधील उपलब्ध शक्तीचा अधिकाधिक वापर करून घेवून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवता येते, असे मत आयोध्या चॅरीटेबल संस्थेचे संचालक लक्ष्मण कागणे यांनी व्यक्त केले. 

निरंतर पुनर्वसन प्रशिक्षण कार्यक्रमात ( सीआरई) मार्गदर्शन करताना कागणे बोलत होते. उशीरा वाचा व भाषा असणा-या मुलांमध्ये आकलनीय वाचेचा विकास या विषयावरील हे प्रशिक्षण पाच दिवस सुरू आहे. महाराष्ट्रातील विशेष शाळेतील शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. 

या प्रशिक्षणात वाचा विकासाच्या कायदेशीर तरतुदीचा परिचय या विषयावर लक्ष्मण कांगणे, वाचा ध्वनी विकास व वाचेची वैशिष्टये या विषयावर राजश्री किर्तीकर, वाचा निर्मीती व वाचा व भाषा उशीरा करणारे दोष या विषयावर सुनिल पाटील, खंडकिय- अखंडकीय घटक व त्यांचे वाचेशी असणारे संबध या विषयावर संदीप चावरे यांनी , वाचेचे साधनाद्वारे व आकलनाद्वारे विश्लेषन या विषयावर पियुष सोने यांनी तर, चाचणी, साधने आणि त्याचा अनुप्रयोग-प्रात्यक्षिक याविषयार कांचन खत्री यांनी, वाचा अकलनावर परिणाम करणारे घटक आणी आकलनियतेचे महत्व या 

विषयावर राजश्री किर्तीकर, पराखंडकिय घटक व त्यांचा वाचेशी असणारा संबध या विषयावर मोनिका ठाकूर, आकलणीय भाषा निर्मीतीचा पाठ आराखडा या विषयावर मोनिका ठाकूर तर उशीरा भाषा व वाचा असणा-या मुलांच्या वाचेचे मुल्यांकन या विषयावर राजश्री किर्तीकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रशांत घाटके यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com