सामाजिक हितासाठी काम करत राहणार - संतोष कांबळे

रमेश मोरे
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

जुनी सांगवी (पुणे) : प्रभातील नागरीकांच्या समस्या व सामाजिक हितासाठी काम करत राहणार आहे. नागरीकांच्या विश्वासाला मी माझ्या कार्यकाळात कुठेही तडा जाऊ देणार नाही. असे पिंपरी चिंचवड महापालिका जुनी सांगवी प्रभाग क्र.32 येथील अनुसुचित प्रवर्गातील नगरसेवक संतोष कांबळे यांनी येथील जेष्ठ नागरीक संघ व समाज बांधवांच्या वतीने नगरसेवक वर्षपूर्ती झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात बोलताना व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, माझ्या सर्वसामान्य, कष्टकरी वर्गासाठी मी सदैव तत्पर राहुन काम करेन. राजकारण विरहित विकास व्हावा हे आमचे ध्येय आहे. जुनी सांगवी येथील जेष्ठ नागरीक संघ व समाज बांधवांच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेवक कार्यकाळास एक वरेष पुर्ण झाल्याबद्दल प्रभाग क्र.32 मधील नगरसेवक संतोष कांबळे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना नागरीकांच्या वतीने यशस्वी व कर्तव्यदक्ष, कार्यक्षम नगरसेवक म्हणुन गौरविण्यात आले. कार्यक्रमास जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष साहेबराव कांबळे, भारीप बहुजन महासंघाचे, पी.आर.गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे, डी.व्ही.सुरवसे, मारूती मोहिते, समता बुद्ध विहाराचे सूर्यकांत कांबळे, जी.आर.कांबळे, नामदेव आरस्कर, तेजस चाबुकस्वार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. वसंत कांबळे यांनी केले. तर आभार अमित बाराथे यांनी मानले.

Web Title: Marathi news pune news social work santosh kambale