क्रिडा संस्कृती वाढीस लागण्याची आवश्यकता : आमदार भरणे

प्रशांत चवरे
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

भिगवण (पुणे) : तरुणांची उर्जा ही विधायक कामांकडे वळविण्यासाठी व शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी खेळ महत्वपुर्ण भुमिका बजावतात. क्रिडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी गावांगावांमध्ये विविध क्रिडा स्पर्धा भरविण्यात येत आहेत ही आनंदाची बाब आहे. ग्रामीण भागांमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या हौशी हॉलीबॉल स्पर्धांसारख्या स्पर्धामधुन क्रिडा संस्कृती वाढीस लागण्यास निश्चित मदत होईल असा विश्वास इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.

डिकसळ (ता.इंदापुर) येथील योगेश्वरी स्पोर्ट क्लबच्या वतीने हौशी व्हॉलीबॉल स्पर्धाचे  उदघाटन इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास बाजार समितीचे उपाध्यक्ष य़शवंत माने, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, हनुमंत बंडगर, माजी सभापती रमेश जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, अनिल लोंढे, सचिन सपकळ, शंकरराव गायकवाड, महेश शेंडगे, विजयकुमार गायकवाड, अर्जुन सुर्यवंशी, जिजाराम पोंदकुले उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मांडलेल्या पुनर्वसनाचा प्रश्न मांडण्यात आला त्याबाबत बोलताना आमदार भरणे म्हणाले, उजनी धरणाच्या उभारणीस चाळीस वर्षे होऊन गेली तरीही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे प्रश्न कायम आहेत. तालुक्यातील पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक प्रस्ताव घेऊन या याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करु. यावेळी रमेश जाधव, प्रताप पाटील, भास्कर काळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड यांनी केले सुत्रसंचालन संतोष पवार यांनी केले तर आभार रावसाहेब गवळी यांनी मानले.

हौशी व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये राज्यातील ६७ संघ सहभागी झाले होते. सोलापुर संघाने बोरी संघावर मात करत २१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले, बोरी संघाने द्वितीय क्रमांकाचे १७ हजार रुपयांचे तर डोर्लेवाडी संघाने ११ हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. अनिल लोंढे, सतीश गायकवाड, विकास काळे, गुरुदत्त मोरे, सुनिता गवळी, विजयकुमार गायकवाड, गुरु पवार भालचंद्र पवार यांचे वतीने विजेत्या संघास सुमारे ८० हजार रुपयांची रोख पारितोषिके व चषक प्रदान देण्यात आली. स्पर्धेचे नियोजन योगेश्वरी हॉलीबॉल संघाने केले. 

Web Title: Marathi news pune news sports culture important bharne