देशात आणि राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार- बाळासाहेब शिवरकर

समीर तांबोळी
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

हडपसर (पुणे) : "भाजपचे अच्छे दिन आणण्याचे स्वप्न फसवे ठरले असून आता येत्या निवडणूकात देशात व व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार" असे वक्तव्य माजी राज्यमंत्री आणि पुणे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांनी केले. माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी हडपसर परिसरातील पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. याचे प्रत्यंतर गुजरात, राजस्थान येथे झालेल्या निवडणुकात पहायला मिळाले. भाजपला जनतेने नाकारले आहे. शेतकरी आत्महत्या करत असून मध्यम वर्ग त्रस्त आहे. अर्थसंकल्पात मध्यम वर्गीयांची फसवणूक झाली असून येत्या निवडणुकांमध्ये भाजपाचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. शिवरकर पुढे म्हणाले, पुणे महानगरपालिका निवडणूकीत लाटेचा फटका कार्यक्षम नगरसेविका विजया वाडकर यांना बसला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हडपसर ब्लॉक कमीटीचे अध्यक्ष प्रशांत मामा तुपे होते. या वेळी चंद्रकांत मगर, अमित घुले, शिवाजीराव वाघ, अजित ससाणे, राजू शिवतार, सोपान लोंढे, नंदो जाधव, शांताराम जाधव, म्हबूब शेख, धर्मराज मेहेत्रे, अनिल भुजबळ, भगवान गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अॅड. मच्छिंद्र वाडकर, कैलास वाडकर, रामदास वाडकर, मधुकर वाडकर, चंद्रकांत ससाणे, गणेश फुलारे, महेंद्र बनकर, ल्हू वाघोले, बाळकृष्ण मोरे, अशोक काळभोर, व परिसरातील कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Marathi news pune news state central government congress