कोणत्याही परिस्थिती असहिष्णुता पसरणार नाही काळजी घ्यायला हवी - अजित पवार 

मिलिंद संगई
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

बारामती : सर्व सामाजिक घटकांनी सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा राखत गुण्या गोविंदाने राहिले पाहिजे, कोणत्याही परिस्थिती असहिष्णुता पसरणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी, अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बारामती तालुका मराठा सेवा संघाच्या राजमाता जिजाऊ भवन येथे राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी यांच्या पुतळ्याचे अनावरण अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, प्रत्येक वेळेस तेढ निर्माण होते तेव्हा शेवटचा माणूस यात भरडला जातो. आपण कोणत्या जाती धर्माचे आहोत याचा विचार करण्यापेक्षाही आपण भारतीय आहोत याचाच विचार प्रत्येकाने करण्याची आज गरज आहे. आजच्या परिस्थितीत काही घटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांचा चुकीचा सल्ला स्विकारु नका व सामाजिक सलोखा कायम ठेवा. 

बारामतीत सिंहासनावर बसलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा साकारण्याचे काम येत्या एक तारखेपासून सुरु करणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केली. नव्या पिढीला शिवरायांपासून सातत्याने प्रेरणा मिळावी हा पुतळा उभारण्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. नामदेव तुपे, देवेंद्र शिर्के, प्रदीप शिंदे यांच्यासह इतर सहकाऱ्यांचे अजित पवार यांनी या वेळी कौतुक केले.  प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष नामदेव तुपे यांनी कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमास समाजाच्या सर्व घटकातील प्रमुखांना आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते. अॅड. विजय तावरे यांनी आभार मानले. या प्रसंगी बारामतीत उभारल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी छत्रपती ग्रुपचे अॅड. रितेश सावंत, आबा सोळसकर, आबा सातव, अमरजित जगताप, सुयोग मुथा, सचिन सस्ते, संदीप निकम, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रसेन चव्हाण यांनी पाच लाखांची देणगी जाहीर केली. अजित पवार यांनी या सर्व सदस्यांचे कौतुक केले. 

Web Title: Marathi news pune news statue of shivaji and rajmata jijau inaugurated by ajit pawar