दोन वाहनचोरांकडून 10 दुचाकी जप्त

संदिप जगदाळे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

हडपसर : हडपसर पेलिसांनी दोन दुचाकी चोरांना पकडून त्यांच्याकडून 10 दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपींनी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 3, बारामती पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1 व चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1 गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सिराज नजीर शेख (वय 23, रा. अहमदनगर) व अकील गफार सय्यद (वय 24, रा. राशीन, ता. कर्जत) या दोघांचा समावेश आहे. 

वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू पवार, विश्वजीत खुळे, अंजूम बागवान, सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप देशाने, प्रसाद लोणारे, मंगेश भांगे, युसुफ पठाण, राजेश नवले, प्रमोद टिळेकर, गणेश दळवी, प्रताप गायकवाड, सैदोबा भोजराव, विनोद शिवले, नितीन मुंढे, अमित कांबळे, अकबर शेख, दाउद सय्यद यांनी वरील कामगिरी केली. 

सदर आरोपींना पोलिसांनी राशीन (ता. कर्जत) येथून ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्यांनी गुन्हयांची कबुली दिली. पुणे शहरातून दुचाकी चोरून ग्रामीण भागात या दुचाकी वापरल्या जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

Web Title: Marathi news pune news stolen bike seized by police