पुणे - अभ्यासाच्या टेन्शनमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या 

संदीप घिसे 
गुरुवार, 1 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : आईवडील आणि शिक्षकांनी अभ्यास करण्यासाठी सांगितल्यामुळे आलेल्या टेन्शनमधून विद्यार्थिनींने आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे बुधवारी (ता.२८) दुपारी घडली. 

खुशी माऊली सिंग (वय १३ रा. डोळस वस्ती भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खुशीने राहत्या घरामध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच तिच्या आईने व भावाने तिला त्वरित खाली उतरवले व रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुपारी सव्वाचार वर्षांच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.

खुशी ही संत साई इंग्लिश मीडियम स्कूल येथे सातवीमध्ये शिकत होती. ती अभ्यासात कमकुवत असल्याने तिचे पालक व शिक्षक तिला वारंवार अभ्यास करण्यासाठी सांगत होते. या अभ्यासाच्या टेन्शनमधून तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता तिचे वडील माउली सिंग यांनी व्यक्त केली आहे. याबाबत अधिक तपास भोसरी पोलिस करत आहेत.

Web Title: Marathi news pune news student suicide frustration