विद्यार्थ्यांनी पक्षांना चार खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी तयार केली भांडी

बुधवार, 14 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : चिवू,काऊ नो या...चारा खावा...पाणी प्या... अन् भुर्रु उडून जावा...ही साद घातली आहे, बोराटवाडी (ता.इंदापूर) येथील लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी... येथील विद्यालयातील सव्वाशे विद्यार्थ्यांनी पक्षांना चारा खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी भांडी तयार केली असून शाळेच्या व विद्यार्थ्यांनी घराच्या परीसरामध्ये झाडांना लावली आहे.

चालू वर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासुन उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. तसेच सुगीचे दिवस संपत आले असून पक्षांना चारा व पाणी मिळावी यासाठी येथील लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भोपळा, गव्हाचे काड, नारळाचे केसर, ऊसाची चिपाडे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, फुटलेले ड्रम पासुन वेगवेगळ्या आकाराची घरटी व भांडी तयार केली अाहेत. तयार केली भांडी व घरटी शाळेच्या आवारात असलेल्या झांडाना बांधण्यात आली असून शाळेतील विद्यार्थी  घराशेजारील  झाडांना भांडी व घरटी बांधणार आहे.

भांडी व घरटी तयार करण्यासाठी  विद्यार्थ्यांना  शाळेचे प्राचार्य दशरथ घोगरे, शिक्षक अमर निलाखे, सचिन भुजबळ  यांनी मार्गदर्शन केले. पक्षांसाठी राबविलेल्या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील , निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, सचिव  किरण पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.