मैत्रिणीच्या मदतीसाठी चिमुकले उतरले रस्त्यावर

दत्ता म्हसकर
सोमवार, 1 जानेवारी 2018

या सेनेने खूप कष्ट घेतले व मैत्रीचा एक पैलू दाखवून दिला समाजाला. 10, 50, 100, 500 मिळून आज या बालचमुनीं 15000 रु जमा केले. या मध्ये स्वप्नील शांताराम बोंबले यांनी 2000 रु  देऊन मुलांच्या आर्त हाकेला साद दिली. रेवतीच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला मुलांची मैत्री पाहून दुसऱ्यासाठी मदत मागतानाचा व दुसऱ्याला मदत करतानाचा आनंद ,समाधान मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. 

जुन्नर : आमच्या मैत्रिणी ला मदत करा !!
जुन्नर येथील रेवती देशपांडेला हृदय प्रत्यारोपणसाठीसर्वच लोक मदत करत आहेत. पण, तिच्या वर्गात शिकणाऱ्या तिचे वर्ग मित्र व मैत्रिणींना आपण ही रेवतीला काही मदत करावी असे वाटत होते. इ ४ थीचे ९ वर्षे वय असणारे या बालचमूची तळमळ व इच्छा पाहून पालक शीतल खरपुडे यांनी निधी जमा करण्याची कल्पना सुचवली त्यांना ती आवडली. 

रविवार सुट्टीचा खेळण्याचा आराम करण्याचा दिवस पण मैत्रीत काही तरी करण्याची इच्छा त्यांना शांत बसू देईना. मित्र मैत्रिणी सकाळ पासूनच तयार झाले.त्यांचा उत्साह पाहून पालक शीतल खरपुडे व सुवर्णा मेहेर यात सामील झाले. रविवार पेठेत गणपतीचे दर्शन घेऊन ही वानर सेना निघाली खारीचा वाटा उचलण्यासाठी रेवती दीदीला मदत करण्यासाठी ६ वर्षांची वेदश्री ही त्यांच्या बरोबरीने चालत होती. आनंदाने मदत करा मदत करा, आमच्या मैत्रिणीला मदत करा अशा घोषणा देत देत हळू हळू निधी जमा करू लागले.

कधी कोणी पुढे जा म्हणलं तर कधी नंतर या म्हणून सांगितलं तर कोणी एक रुपया काढून दिला. पण ही सेना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सज्ज झाली होती न थकता न हरता पुढे जात राहिली. मग कोणी कोणी 100, 500 च्या नोटा काढल्या
 मुले आणखी उत्साहाने ऊन डोक्यावर घेऊन बाजारात मदत मागत होती. एक दिवस बाजार करून आठ दिवस घर चालवणारी, फुलं-डूल विकणारी, भाजी विकणारी मावशी 10 रु. बरोबर तुमची मैत्रीण लवकर बरी होईल म्हणत तोंड भरून आशीर्वाद देत होती.
लोक कौतुकाने त्यांना मदत करत होते. या वयात मैत्रीचं नात जपणाऱ्या समाजीकतेची, मानवतेची जाणीव असणाऱ्या मुलांचं कौतुक करत होती.

यात खालील मोठे मोठे सेनानी होते
शुभदा शितल खरपुडे. 9 वर्ष
गौरी सुमंत मेहेर  9 वर्ष
वैष्णवी शैलेश  बनकर  9 वर्ष
वेदश्री शितल खरपुडे  6  वर्ष
शिवराज महादेव राबडे  9 वर्ष
पार्थ अमोल हराळे 9 वर्ष
स्वराज दिपक साबळे 9 वर्ष
मयुरेश अभिजित वाव्हळ 9 वर्ष

या सेनेने खूप कष्ट घेतले व मैत्रीचा एक पैलू दाखवून दिला समाजाला. 10, 50, 100, 500 मिळून आज या बालचमुनीं 15000 रु जमा केले. या मध्ये स्वप्नील शांताराम बोंबले यांनी 2000 रु  देऊन मुलांच्या आर्त हाकेला साद दिली. रेवतीच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला मुलांची मैत्री पाहून दुसऱ्यासाठी मदत मागतानाचा व दुसऱ्याला मदत करतानाचा आनंद ,समाधान मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. 

Web Title: Marathi news Pune news students help friend