वाढत्या उन्हामुळे ऊसाच्या फिरत्या रसवंती सुरू

कृष्णकांत कोबल 
मंगळवार, 13 मार्च 2018

मांजरी (पुणे) : उन्हाची काहिली जसजशी वाढू लागली आहे, तशी घराबाहेर वावरणाऱ्या नागरिकांची पावले रसवंतीकडे वळू लागली आहेत. मात्र, केवळ उन्हाळ्यापुरता फायदेशीर राहत असलेल्या या व्यवसायातील स्पर्धा लक्षात घेऊन फिरत्या रसवंती गृहाच्या माध्यमातून हे व्यवसायिकच ग्राहकांपर्यंत पोहचू लागले आहेत. ग्रामीण भागातून रोजगाराच्या निमित्ताने आलेली अनेक कुटुंब व  तरूणांनी अशा फिरत्या रसवंती सुरू केलेल्या आहेत. रसवंती गृहापेक्षा अशा फिरत्या रसवंतीवर थंडावा घेण्याला नागरिकांकडूनही पसंती दिली जात आहे.

सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने कामगार, व्यवसायीक, विद्यार्थी व दैनंदीन कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांची रसवंतीगृहासह फिरत्या रसवंतीवर रसासाठी गर्दी होत आहे. सायंकाळी सहा पर्यंत ही फिरती रसवंती परिसरात ठिकठिकाणी पाहवयास मिळतात.

अनेक तरूण व महिला तसेच पती-पत्नीच्या जोड्या खास फिरत्या रसवंतीच्या व्यवसायासाठी ग्रामीण भागातून उपनगरात दाखल झालेल्या आहेत. यातील काही रसवंती स्वयंचलित तर काही मनुष्यबळाने चालविली जात आहेत. बाजारपेठा, रहदारीचे रस्ते, शाळा महाविद्यालये, व्यवसायीक इमारती आदी परिसरात सध्या फिरत्या रसवंती पाहवयास मिळत आहे.

रसवंतीसाठी वापरला जाणारा बर्फ चांगला असेलच असे नाही. त्यामुळे आरोग्याबाबत   जागृत असलेले अनेक ग्राहक बर्फ न मिसळलेल्या रसाची मागणी करीत असतात. ऊसाच्या रसवंतीवर बर्फ न टाकलेल्या एका ग्लाससाठी वीस तर बर्फ टाकलेल्या ग्लाससाठी पंधरा रुपये आकारले जात आहेत. 

फिरती सवंती चालविणारा तरूण अशोक महाजन म्हणाला,"हा व्यवसाय उन्हाळ्यापुरता मर्यादित आहे. नोकरी नसल्याने अहमदनगरच्या ग्रामीण भागातून येऊन दीड लाख रुपयांचे भांडवल गुंतवून फिरत्या रसवंतीचा व्यवसाय सुरू केला आहे. धंदा आहे मात्र, इतर व्यवसायीक गाडी उभी करून देत नाहीत. हुसकावून लावतात. जेथे कुठे गाडी उभी करतो, तेथे कोण बोलेल की काय ? अशा तणावात धंदा करावा लागत आहे. त्यामुळे संधी असूनही अपेक्षित व्यवसाय होत नाही.''

Web Title: Marathi news pune news sugarcane juice moving shop